Rajkummar Rao's Reaction Over Shraddha Kapoor :  बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा दोघेही अजून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशात तिचा प्रमोशन दरम्यानचा, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राजकुमार रावनं जी रिअॅक्शन दिली आहे त्यावर नेटकरी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा तिच्या स्ट्रगलविषयी बोलताना दिसते. तर तिच्या शेजारी राजकुमार राव बसलेला असतो त्याचे एक्सप्रेशन हे चर्चेचा विषय ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडिटवर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्रद्धा कपूर बोलताना दिसते की इंडस्ट्रीमध्ये दोन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर कसं कोण तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हतं. श्रद्धानं तिचा बॉलिवूड पदार्पण हे तीन पत्ती या चित्रपटातून केलं होतं. त्यानंतर ती 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव का द एंड या चित्रपटात दिसली होती. खरंतर, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वाईट पद्धतीनं फ्लॉप झाले. 


After ananya pandey we have new struggler queen Aka babudi PR kapoor. Rajkumaar expressions and reaction are hilarious
byu/Impressive_Desk_586 inBollyBlindsNGossip

श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात श्रद्धा तिनं दोन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कोणीही तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हतं, तेव्हा मोहित सुरीनं तिला संधी दिली. तर श्रद्धा ही 'आशिकी 2' मध्ये दिसली होती. श्रद्धानं सांगितलं की अनेक ऑडिशन्स द्यावे लागले कारण त्यावेळी कोणाला माझ्यासोबत काम करायची इच्छा नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचे चित्रपट फ्लॉप झालेले असतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पुढेही येतात आणि त्यामुळे तुम्हाला पुढे चित्रपट मिळणं कठीण असतं. मग मोहित सुरीला काय माहित काय वाटलं काय माहित आणि त्यानं विश्वास दाखवला. 


हेही वाचा : कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल


दरम्यान, या सगळ्यात या व्हिडीओमध्ये राजकुमार रावच्या रिअॅक्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राजकुमार राव या आधी सोनम कपूर आणि जान्हवी कपूरसोबत देखील अशा एका मुलाखतीचा दिसला होता. जिथे त्या दोघी त्यांच्या स्ट्रगलविषयी सांगत होत्या. या व्हायरल क्लिपला घेऊन नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'राजकुमार रावच्या सैयम्माची स्तुती करायला हवी. आम्ही हे सहन करू शकलो नसतो.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तो एक उत्तम अभिनेता आहे. तो त्याचा चेहरा कसा न्युट्रल ठेवतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'राज पुन्हा एकदा क्राइम सीनवर, त्याच्यासोबतच नेहमी असं का होतं?'