कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल

Rhea Chakraborty Bike Ride With Billionaire Boyfriend : रिया चक्रवर्तीचा आणि तिच्या अब्जाधीश बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या गोष्टीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 18, 2024, 12:03 PM IST
कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Rhea Chakraborty Bike Ride With Billionaire Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती काल तिचा कथित बॉयफ्रेंड बिझनेसमॅन निखिल कामथसोबत स्पॉट झाली आहे. शनिवारी दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे फोटो हे पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खरंतर त्या दोघांना मुंबईत बाइकवर फिरताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. त्यानंतर अनेकांनी रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

रिया आणि निखिल कामतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रिया ही निखिल कामथच्या बाइकवर मागे बसल्याचे दिसत आहे. तर या आउटिंगच्या वेळी रियानं डेनिम जॅकेट, क्रॉप्ड आणि जांभळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्या दोघांनी त्याच्या चेहऱ्यावर मास्क परिधान केला आहे. तर रियानं छोठी स्लिंग बॅग घेतली आहे. तर तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पोनीटेल घातली आहे पण तिनं हेलमेट घातलेलं नाही. तर निखिलनं काळ्या रंगाचं जॅकेट आणि जॅकेट परिधान केलं आहे. त्यानं चेहऱ्यावर मास्क घातला असून हेलमेटही घातलं आहे. जेव्हा तो बाइक चालवत होता तेव्हा रिया त्याच्याशी बोलताना दिसली तर तिनं त्याच्या पायावर तिचे हात ठेवले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर रिअॅक्शन देत एक नेटकरी म्हणाला, 'हेलमेट? तिच्यासाठी काही खास नियम आहे का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मागच्या सीटवर बसणाऱ्यासाठी हेलमेटची गरज नाही का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'फक्त यासाठी की रिया इथे आहे, हेलमेटची गरज नाही?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अरे दीदी, हेलमेट तर घातलं असतं.'

हेही वाचा : 'त्यानं माझ्यासमोर त्याचं गुप्तांग...'; कोलकाता बलात्कार प्रकरण चर्चेत असतानाच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, गेल्या महिन्यात रियानं चॅप्टर 2 सोबत तिचा पॉडकास्ट डेब्यू केला होता. यात तिनं म्हटलं की 'सगळ्यांना माझं 'चॅप्टर वन' माहितीये, किंवा असं समजू याकी सगळ्यांना माहित आहे. मी वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या व्हर्जनमधून जाण्याचा अनुभव घेणार आहे. सगळ्यात शेवटी मी, माझ्या स्वत:च्या एका नवीन व्हर्जन, पुनर्जन्म झाला आहे आणि मला तो 'चॅप्टर 2' सोबत साजरा करायचा आहे. मला असं म्हणायचं आहे की जीवनात पुढे जाण्यासाठी, पुन्हा सुरू करण्यासाठी आणखी एका चॅप्टर असणं ठीक आहे. मला बदल साजरा करायचा आहे.'