मुंबई : 'आशिकी 2' चित्रपटातून अभिनेत्री श्रद्धा कपूरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. श्रद्धाचा पहिलाचं चित्रपट तिच्या करियरसाठी फार लाभदायक ठरला. त्यानंतर श्रद्धाने कधीही मागे वळून पाहिलं नाही.  'आशिकी 2' नंतर श्रद्धा चर्चेल आली 'ABCD 2' चित्रपटातील तिच्या डान्समुळे. सतत चर्चेत असणारी श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर आहे. अशात नुकताचं दिलेल्या एका मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुसाला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चर्चेत नसलेल्या श्रद्धा सतत एकचं प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे, 'श्रद्धा सध्या काय करते?'  तिच्या प्रोफशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर यंदाच्या वर्षी तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ती सध्या फिल्ममेकर लव रंजनसोबत काम करत आहे. श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये  व्यस्त आहे. 



'श्रद्धा सध्या काय करते?'  प्रश्नावर श्रद्धा म्हणाली, ' मी येथेचं आहे. लव सरांसोबत शुटिंगमध्ये व्यस्त आहे आणि माझ्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहे....' एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी श्रद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. श्रध्दाने तिचा फोटोग्राफर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत लग्न केल्याची बातमी आली होती. मात्र, श्रद्धाने या सर्व बातम्यांना निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.


श्रद्धा म्हणाली, 'मला वाटत नाही की या सर्व गोष्टींमुळे माझं कामापासून लक्ष विचलित होईल कारण मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कधीच बोलली नाही.' लव रंजन दिग्दर्शित चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी, याशिवाय श्रद्धा कपूर पुढच्या वर्षी लंडनमध्ये शूट होणार्‍या चालबाज चित्रपटाच्या रिमेकमध्येही दिसणार आहे.