मुंबई : अभिनेता अमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी 'पाणी फाउंडेशन' संस्थेची स्थपना केली महाराष्ट्रातील अनेक गाव या स्पर्धेत उतरले आहेत. कोणत्याही प्रकारच्या नफ्याचा विचार न करणारी ही संस्था आहे. फक्त गावाचा विकास हाच पाणी फांउडेशनचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना 'पाणी फांउडेशन' दुष्काळग्रस्तांसाठी देवदूत म्हणूण काम करत आहे. १ मे म्हाणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या कुटुंबासह श्रमदान केले. श्रमदानादरम्यानचे काही फोटो:   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


स्पृहा जोशीची ओळख संवेदनशील अभिनेत्रीसोबतच संवेदनशील कवयित्री अशीही आहे. स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. 1 मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात 'पाणी फाउंडेशन'च्या श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.


स्पृहा म्हणते, “मी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर गावात श्रमदानासाठी गेले होते, आणि माझ्या श्रमदानातल्या त्या चांगल्या अनुभवानंतर माझी आई आणि काकू दोघींनीही यंदा माझ्यासोबत श्रमदानात सहभागी व्हायचं ठरवलं. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या पाणी फाउंडेशनच्या मोहिमेत मला सहभागी होता येतंय, याचं मला समाधान वाटतंय. महाराष्ट्रला सुजलाम सुफलाम करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचा आनंद वेगळाच आहे.