Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची उत्सुकता आता सगळ्यांना असून या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. जेव्हापासून निर्मात्यांनी चित्रपटाचं दुसरं गाणं 'द कपल सॉन्ग' चा टीझर शेअर केला आहे. हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी आणि सदैव मधुर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार DSP हा कायम त्याचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखला जातो आणि म्हणून आता सगळ्याच आगामी गाण्याची आतुरतेनं वाट बघत आहेत. 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट नक्कीच धमाकेदार ठरणार यात शंका नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे गाणं 'अंगारों', 'सूसेकी', 'सूदाना', 'कंडालो', 'नोडोका' आणि 'AAGUNER' अनुक्रमे हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे येणार आहे. आजवर देवी श्री प्रसाद यांनी हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे पण DSP आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर गाण्याची पर्वणी ऐकायला प्रेक्षक आतुर आहेत.


गेल्या काही वर्षांमध्ये डीएसपी हे लोकप्रिय संगीतकारांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याला केवळ दाक्षिणेतील प्रेक्षकांसाठी स्टेज कसा सेट करायचा हेच माहीत नाही तर बॉलिवूडच्या प्रेक्षकांनाही त्याच्या मनमोहक बीट्सवर खिळवून ठेवायचे आहे. आता देश 'पुष्पा 2: द रुल' सोबत त्याची जादू पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला...


थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रुल' पाहण्याची प्रतीक्षा करत असताना चाहते पुढील संगीत अपडेट्ससाठी आतुर आहेत. अल्लू अर्जुन-स्टारर व्यतिरिक्त, DSP च्या 2024 म्युझिकल लाइन अपमध्ये सुर्याचा 'कंगुवा', राम चरणचा पुढचा, तात्पुरते शीर्षक असलेला 'RC 17', पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग', अजित कुमारचा 'गुड बॅड अग्ली', धनुषचा 'कुबेरा', आणि नागा चैतन्यचा 'थंडेल' हे प्रोजेक्ट्स देखील आहेत. दरम्यान, पुष्पा या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात अल्लु अर्जुनसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे.