कॉन्सर्टनंतर Shreya Ghoshal चा आवाजच गेला; बापरे हे असंही होतं? गायिका प्रचंड भावूक
कॉन्सर्टनंतर Shreya Ghoshal चा आवाज गेला..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. श्रेया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या श्रेया ही तिच्या कॉन्सर्ट्समध्ये व्यस्त आहे. काही वेळा पूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रेयानं एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. तिचा आवाज अचानक गेल्याचे तिनं सांगितलं आहे.
श्रेयानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक मोठी बातमी शेअर केली आहे. श्रेयानं तिचा आवाज पूर्णपणे गेल्याचे सांगितले आहे. उपचारानंतर आणखी एक स्टोरी शेअर केली असून ती खूप भावूक झाली आहे. 'मला माझा बँड, फॅम आणि माझी ए टीम खूप आवडते. माझ्या सर्वोत्तम आणि सर्वात वाईट टप्प्यात त्यानं मला साथ दिली आहे. काहीही झाले तरी मला शाइन करण्यास मदत केली. (shreya ghoshal had lost her voice completely after concert could not sing shocking post)
पाहा श्रेयाची पोस्ट -
श्रेया पुढे म्हणाली की, काल रात्री ऑरलैंडोमधील नाईट कॉन्सर्टनंतर मी माझा आवाज पूर्णपणे गमावला. माझ्या हितचिंतकांचे आशीर्वाद आणि डॉ. समीर भार्गव यांनी घेतलेल्या काळजीमुळे मला माझा आवाज परत मिळू शकला. यानंतर, मी न्यूयॉर्क एरिना येथे 3 तासांच्या खचाखच भरलेल्या मैफिलीत गाणे गाऊ शकले. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल न्यूयॉर्कचे आभार. श्रेयानं सांगितलं की, तिचा अमेरिका दौरा संपला आहे.
हेही वाचा : अभिनेत्यानं स्क्रिनवर Intimate Scene देण गर्लफ्रेंडला आवडलं नाही, तर त्यानं केला ब्रेकअप
श्रेया ही संगीत क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्लेबॅक गायकांपैकी एक आहे. श्रेयाला 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या 4 थ्या वर्षी श्रेयानं गायला सुरुवात केली. श्रेयानं अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. 'सा रे ग म पा' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही तिनं भाग घेतला आणि तेही जिंकली. श्रेया फक्त हिंदीतच नाही तर अनेक भाषांमध्ये गाते. संगीत क्षेत्रातील श्रेयाचे योगदान महत्त्वाचे आहे. तिचे लाखो चाहते आहेत.