Shreyas Talpade : अभिनेता  श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, असं म्हटलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रेयसचा जळचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहनं नुकतीच श्रेयसच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. त्याला कधी डिस्चार्ज मिळणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागंल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहम शाहचं मोठं वक्तव्य 
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेचा जवळचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहने श्रेयसच्या तब्येतीची माहिती दिली आहे. याविषयी बोलताना सोहम म्हणाला, 'मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. श्रेयसची प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी त्याला डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आज सकाळी तो आमच्याकडे पाहून हसला. आम्हा सर्वांसाठी हा दिलासा होता. मी दीप्तीचे देखील मनापासून आभार मानतो, तिने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर  विलंब न करता त्याला रुग्णालयात दाखल करणं खूप आव्हानात्मक होतं. अशा स्थितीत दीप्तीच्या विचारांचे कौतुक करावंसं वाटतं. मी देवाचे देखील आभार मानतो कारण तो बरा होत आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत." त्याचं हे वक्तव्य ऐकून त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळेल हे मात्र नक्की.


तर नुकतीच तृप्तीने पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की, "तुमच्या शुभेच्छांबद्दल मी आभार व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. श्रेयसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार." 


वेलकम टू या चित्रपटाच्या सेटवर श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. आता लवकरात लवकर बरा व्हावा अशी ईच्छा चाहते व्यक्त करत आहेत. वेलकम टू जंगल या चित्रपटात  अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.