भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला `तो` किस्सा अन्... पाहा Video
Shreyas Talpade in khupte tithe gupte: श्रेयस तळपदेचा लाडका मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) व्हिडीओ कॉल लावण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र जोशीने भावूक अनुभव शेअर केला आहे.
Shreyas Talpade Emotional video: छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम सध्या तुफान चर्चेत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पहिल्या एपिसोडनंतर खुपते तिथे गुप्तेचं दुसरं पर्व महाराष्ट्रभर गाजताना दिसतंय. अशातच या कार्यक्रमात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी श्रेयस तळपदेचा लाडका मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) व्हिडीओ कॉल लावण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र जोशीने भावूक अनुभव शेअर केला आहे.
श्रेयस बद्दल माझ्या मनामध्ये अनेक भावना आहेत. त्याच्या अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्याकडे जेव्हा काम नव्हतं तेव्हा आपला मित्र सतिश राजवाडे याच्याकडे मला कामासाठी घेऊन जाणारा तूच होतास, असं जितेंद्र जोशी व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. लाडक्या मित्राचे हे शब्द ऐकताच श्रेयसला भरून आलं. त्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.
त्यावेळी जितेंद्र जोशीने एक किस्सा देखील सांगितला. एक गोष्ट अजूनही खूप ठळकपणे आठवते. तुझ्या आईने तुला सांगितलं होतं की, कुठंतरी नोकरी वगैरे बघा आता नाटकामधून काही होत नाही. तेव्हा आम्ही दोघं स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये गेलो. आम्ही तिथं मिळून प्रार्थना केली. त्यानंतर जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिलं, असं म्हणताच श्रेयस तळपदेच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतोस, असं म्हणत जितेंद्र जोशीने श्रेयस तळपदेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा Video
दरम्यान, श्रेयसने त्यावेळी वाईट अनुभव देखील शेअर केले आहेत. पोश्टर बॉईज चित्रपटातील काही कलाकारांना घेऊन दुसरा चित्रपट दिग्दर्शित केला, असं तळपदे सांगतो. मी असोसिएशनमध्ये फोन केला आणि त्यांना विचारलं की हे नाव कधी रजिस्टर झालं? तेव्हा मला कळलं की हे नाव सहा महिने आधीच रजिस्टर करण्यात आलं होतं. ते ऐकून मला वाईट वाटलं, असंही श्रेयसने यावेळी सांगितलं. त्यावेळी त्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.