मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकूळ (Myra Vaikul) यांच्या नात्यातील गोडव्याने तर बाप-लेकीचं प्रेम दाखवून दिलं. रविवारी जगभरात कन्या दिवस (Daughters Day) मोठ्या उत्साहात पार पाडला. अनेकांनी आपल्या मुलींसाठी दोन शब्द लिहिली. या शर्यतीत श्रेयस देखील मागे राहिला नाही.  श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदेला स्वत:ची एक मुलगी आहे. पण मी तीन मुलींचा  बाबा आहे.. असं श्रेयसने पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे त्या तीन नशीबवान मुली कोण असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसने काय लिहिले आहे पोस्टमध्ये... (Shreyas Talpade  post on Daughters Day)
'असं फार क्वचित होतं जेव्हा तुम्ही स्वतःला नशीबवान समजता. तो दिवस आज आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की मी तीन सुंदर आणि प्रेमळ मुलींचा बाबा आहे. मी आद्या, मायरा आणि खुशी या तिघींमुळेच एक चांगला वडील बनू शकलो आहे. त्यांच्या गोड वागण्यामुळे हे शक्य झालं आहे आणि तेच स्क्रीनवर दिसून येतं. तेव्हा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन मला चांगला डॅड केल्याबद्दल धन्यवाद.' (Shreyas Talpade is father of three daughter)



सध्या श्रेयसची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल श्रेयस आणि मायरामध्ये किती घट्ट नातं आहे. मायरा 'माझी तुझी रेशीम गाठ' मालिके श्रेयसच्या लेकीच्या भूमिकेत दिसत आहे. 


तर श्रेयसची तिसरी मुलगी म्हणजे खुशी... श्रेयस आणि खुशी 'आपडी-थापडी' (Aapdi Thapdi) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर 7 ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात श्रेयस आणि खुशी वडील आणि मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.