Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा पुष्पा या चित्रपटासाठी केलेल्या डबिंगसाठी ओळखला जातो. श्रेयस फक्त एक अभिनेता नाही तर दिग्दर्शक देखील आहे. श्रेयसनं 'पोस्टर बॉईज' आणि 'पेइंग गेस्ट' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर तो एक डबिंग आर्टिस्ट देखील आहे. आता श्रेयस लवकरच 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मासोबत 'द गेम ऑफ कॅमेलियन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आलेली नसली पण त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलेला आहे. दरम्यान, आता त्यानं त्याच्या करिअरविषयीचा एक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेका श्रेयस तळपदेचा हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल Nine Rasa वर शेअर करण्यात आला आहे. हाच व्हिडीओ Fifafooz या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी त्याच्या करिअरविषयी बोलताना श्रेयस म्हणाला, "मी देवाकडे एकच गोष्ट मागतो ती म्हणजे लोक त्यांना येणाऱ्या ऑफर रिजेक्ट करत रहाव्या आणि मला काम मिळत रहावं." चला जाणून घेऊया करिअरमध्ये मिळणाऱ्या रिजेक्शनविषयी काय म्हणाला श्रेयस "बेटा तू खूप मोठा होणार, हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक हसू लागले." त्यावर श्रेयस पुढे म्हणाला, "याचं खरं कारण मी सांगू,कारण मी पण कधीच कोणाची पहिली चॉइस किंवा प्रायॉरिटी नव्हतो आणि मी हे खरं सांगत आहे. इकबालमध्ये मी दुसरी चॉइस होतो. गोलमाल रिटर्न्स मध्ये मी दुसरी चॉइस होतो. ओम शांति ओम मध्ये मी दुसरी चॉइस होतो. हाऊसफुल 2 मध्ये देखील मी दुसरीच चॉइस होतो. वेलकम 2, सज्जनपुर या दोन्ही चित्रपटांमध्ये मी दुसरी चॉइस होतो. डोरमध्ये माझी दुसरी भूमिका होती. काही चित्रपटांमध्ये तर मी तिसरी चॉइस होतो. पण मी आनंदी आहे. मी तर देवाला एकच प्रार्थना करतो की लोक असेच त्यांना येणारं काम रिजेक्ट करू देत आणि ते काम मला मिळू देत." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'दयावान' फेम अभिनेते Mangal Dhillon यांचे निधन, कॅन्सरनं घेतला जीव


दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात श्रेयसनं त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे. त्याचं क्रश कोण होतं असा प्रश्न विचारता एका सेकंदाचाही विचार न करता श्रेयसनं माधुरी दीक्षित असे म्हटले. तर तिच्यासोबत काम करण्याची संधी अजून मिळाली नाही असं यावेळी श्रेयस म्हणाला, इतकंच काय तर त्यांची फक्त एकदाच भेट झाली होती आणि ती पण लिफ्टमध्ये.