मुंबई : बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून कित्येकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी (Shridevi) यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली. आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची उणीव जाणवते. आज श्रीदेवी आपल्यात जिवंत नसल्या तरी, त्यांच्या आठवणी मात्र आजही अनेकांना प्रेरणा देतात. अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ पुन्हा पदार्पण केलं. सिनेमाचं दिग्दर्शन गौरी शिंदे यांनी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अनेक वर्षांनंतर श्रीदेवी पुन्हा ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण आहे त्यांची साडी... सिनेमात श्रीदेवी यांनी नेसलेल्या आयकॉनीक साडीचा लिलाव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गौरी शिंदेने दिली आहे. 5 ऑक्टोबर 2012 या दिवशी ‘इंग्लिश विंग्लिश’ हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. 


गौरी शिंदेने सांगितलं, '‘इंग्लिश विंग्लिश’  सिनेमाला 10 वर्ष झाली आहेत. म्हणून 10 ऑक्टोबरला सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे. शिवाय यावेळी श्रीदेवी यांनी नेसलेल्या साडीचा आम्ही लिलाव करणार आहोत.'



महत्त्वाचं म्हणजे लिलावात येणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी एका सेवाभावी संस्थेला देण्याचा निर्णय गौरी शिंदेने घेतला आहे. त्यामुळे जर तुम्हाला श्रीदेवी यांनी नेसलेली साडी नेसायची असेल तर लिलावात बोली लावून तुम्ही साडी घेवू शकता.


श्रीदेवी यांचे सिनेमे...
सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर 15 वर्षांनी श्रीदेवी यांनी पुन्हा पदार्पण केलं आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’  आणि 'मॉम' सिनेमामुळे पुन्हा प्रसिद्धी झोतात आल्या.