मुंबई : स्मॉल स्क्रीनवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला प्रेक्षकांनी भऱभरुन प्रेम दिलं. या मालिकेतील पात्राला चाहत्यांनी डोक्यावरुन उचलून घेतलं. या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमची जोडीही प्रसिद्ध झाली. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही या जोडीवर कौतुकाचा वर्षाव झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहम आणि शुभ्रा साकारणारे आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. आशुतोषने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. 



ही शॉर्ट फिल्म सोहमने दिग्दर्शित केली आहे. त्याची ही पहिलीचं शॉर्ट फिल्म आहे. यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना एकत्र आणलं आहे. यामध्ये फिल्म स्टार आणि स्मॉल स्क्रिनवरील काही स्टार पाहायला मिळत आहे. 


मालिकेतून शुभ्रा आणि सोहमने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत.