shubman gill dating sara ali khan : बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील आणखी एक प्रेम प्रकरण समोर येत आहे. याआधी देखील क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली. आता यादीमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubhman Gill)यांचं नाव सामिल झालं आहे. क्रिकेटर शुभमन गिल आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) रिलेशलशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे शुभमन गिलने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत शुभमनला असे काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यामुळे सारा आणि शुभमन रिलेशनशिरपमध्ये आहेत की नाही? हे सत्य समोर आलं आहे. मुलाखतीत शुभमनला 'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने अभिनेत्री सारा अली खानचं नाव घेतलं. (shubman gill dating sara ali khan)


पुढे शुभमनला 'तू साराला डेट करत आहेस का?' असा प्रश्न विचारला. यावर क्रिकेटपटू म्हणाला, 'कदाचित....'.  त्यानंतर शुभमनला साराबद्दल सगळं खरं सांग असं सांगण्यात आलं तेव्हा शुभमन म्हणाला, 'सारा दा सारा सच बोल दिया... कदाचित हो... कदाचित नाही... ' (shubman gill sara ali khan)



शुभमनच्या दिलल्या उत्तरानंतर चाहते देखील गोंधळात पडले आहेत. पण त्याने दिलेलं उत्तर मात्र चाहत्यांना आवडलं आहे. त्यामुळे सारा आणि शुभमन त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करतात की नाही... हा येणारा काळच सांगेल... 


दरम्यान... सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल (Viral Photo) झाला होता. फोटोमध्ये शुभमन आणि सारा एकत्र एका हॉटेलमध्ये बसलेले होते. तेव्हा अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी आणि अभिनेत्री सारा आली खान अ आणि शुभमन यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरत असल्याची चर्चा रंगत आहे.