मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमातील कास्टिंगबाबत सतत अपडेट्स येत आहेत. एकीकडे या सिनेमाच्या कास्टिंगची चर्चा होत असताना. या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. बॉबी देओल, सनी देओल आणि लारा दत्तानंतर आता अभिनेत्री कुब्रा सैतचं नाव आता या प्रोजेक्ट्ससोबत जोडलं जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सेक्रेट गेम्समध्ये कुकू हे पात्र साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत 'रामायण'मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून नितेश तिवारी यांच्या रामायण सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या या सिनेमाच्या अपडेट्स एकामागून एक येत आहेत. सध्या सिनेमाच्या कास्टिंगची जोरदार चर्चा आहे. 'सेक्रेड गेम्स'मध्ये कुकूची भूमिका साकारणारी अभिनेत्रीने एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शूर्पणेखेच्या भूमिकेसाठी  कुब्ब्रा सैतने नुकतंच ऑडिशन दिलं आहे. याचबरोबर हा रोल तिला मिळणार असल्याची तिला आशा आहे. तर याचबरोबर केजीएफ फेम यशचा भाऊ या सिनेमात रावणाच्या भावाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय


कुब्रा सैत बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेली अनेक दशकांत तिने सेक्रेड गेम्सशिवाय जवानी जानेमनसोबतच अनेक सिनेमात काम केलं आहे. काजोलची सिरीज ट्रायल आणि शाहिद कपूरची सिरीज फर्जीमध्ये देखील तिने खूप जबरदस्त काम केलं आहे. या व्यतिरिक्त एपल टीव्ही शओ फाउंडेशनमध्ये देखील ती वेगळ्या अंदाजात दिसली होती. 
 
बॉबी देओल करत नाहीये काम
समोर आलेल्या बातमी नुसार नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये  बॉबी देओलला  कुंभकर्णाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने या सगळ्या अफवा फेटाळून लावल्या. सध्या अभिनेता सूर्यासोबत त्याच्या आगामी 'कुंगवा' सिनेमात काम करत असल्याती बातमी आहे. याचबरोबर आर्यन खानची 'स्टारडम' ही वेबसीरिजही या अभिनेत्याकडे आहे.
 
याचबरोबर बॉबी देओलचा मोठा भाऊ सनी देओलला रामायम सिनेमात हनुमानाचा रोल ऑफर करण्यात आला आहे. एवढंच नव्हेतर रणबीर कपूरची देखील हिच इच्छा आहे की, त्यानेच हा रोल निभवावा. तर लारा दत्ता या सिनेमात दशरथची तिसरी पत्नी कैकयीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्च 2024 मध्ये सुरू होणाऱ्या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये लारा रणबीर कपूरसोबत शूट करणार आहे.'रामायण' तीन भागात बनवणार आहे. यामध्ये साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत असल्याचं बोललं जात आहे