मुंबई : अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती श्वेता तिवारी आपल्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारीचा आधीचा नवरा अभिनव कोहली यांच्यात सुरू असलेल्या मतभेदामुळे हे दोघे कायमच चर्चेत असतात. (Shweta Tiwari shares shocking CCTV video of ex-husband Abhinav Kohli physically abusing her & son Reyansh)  सध्या श्वेता आपली मुलगी पलक आणि मुलगा रेयांश कोहलीसोबत राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अभिनव आणि श्वेता यांच्या कायमच रेयांशवरून वाद सुरू असतो. श्वेता कायमच रेयांशच्या सेफ्टीवरून चिंतेत असतं. श्वेताला असं वाटतं की, अभिनव रेयांशची चांगली काळजी घेवू शकत नाही. यामुळे या दोघांचा कायमच वाद होत असतो.



अभिनवची अनेकदा तक्रार असते श्वेता रेयांशशी भेटू देत नाही. आता श्वेताने यावर ठोस पुरावा दिला आहे. आता तिने चक्क आपल्या सोसायटीमधलं फुटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये अभिनव श्वेताकडून रेयांशला खेचताना दिसत आहे. या व्हिडिओमधून श्वेताने अभिनव वर गंभीर आरोप केले आहेत. 


आता सत्य समोर येईल. पुढे ती म्हणते की, मी हा व्हिडिओ फार काळ ठेवणार नाही. पण या व्हिडिओतून सत्य समोर आलं आहे.  या व्हिडिओतून हे स्पष्ट होतंय की, रेयांश खूप घाबरला आहे. तो एक महिन्यापेक्षा जास्त काळ घाबरला होता. तो रात्री चांगला झोपूही शकत नाही. त्याच्या हाताला दोन दिवसापेक्षा अधिक काळ दुखापत झाली. त्याला अजूनही भीती वाटतेय की, त्याचे वडिल घरी तर येणार नाही ना. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. श्वेताने ठोस पुरावा देत व्हिडिओ शेअर केला आहे.