Siddharth Chandekar and Mitali Mayekar : मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघं सध्या मराठीतील पावर कपल आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. ते अनेकदा फॉरेन टूरला जाताना दिसतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी त्यांची युरोप टूर फार गाजली होती. त्यानंतर मिताली मयेकर ही मलेशियालाही गेली होती. अशावेळी तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यंदा ते दोघंही दुबईला गेले होते आणि तिथल्या वाळवंटातही त्यांनी जबरदस्त फोटोशूट केले होते. यावेळी त्यांची जोरात चर्चाही पाहायला मिळाली होती. त्यातून त्यांच्या या हटके फोटोशूटही सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. यावेळी मितालीनं सुंदर अशा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये केलेले फोटोशूटही प्रचंड गाजले होते. तिच्या या फोटोशूटरही कमेंट्सचा पाऊस पडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायनीपांडा म्हणून ओळखलं जाणारं हे कपल कायमच चर्चेत असतं. यावेळी त्या दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे यावेळी चाहते हे त्यांच्या या व्हिडीओवर खिळखिळून हसत आहेत. वाळवंटात मिताली फोटोशूट करत असताना ती धडपडते आणि तिचा तोल जाऊन ती पडते अशातच सिद्धार्थ तिचा हा व्हिडीओ शूट करत असतो आणि तिला पडताना पाहून तो हसू लागतो आणि तिची खिल्ली उडवतो. या प्रसंगावर ते दोघंही जोरात हसू लागतात. सध्या त्यांचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्यात दोघंही खळखळून हसत आहेत आणि तो मोमेंट एन्जॉय करत आहेत. 


हेही वाचा : चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी; ‘या’ तारखेला कुठलाही चित्रपट पाहा फक्त 99 रुपयांत


यावेळी सिद्धार्थने Perks of getting to shoot for the धसमुसळी बायको! Very glamorous. असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओखाली कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओवरही अमृता खानविलकरही हसली आहे. यावेळी नेटकरी हे त्यांच्या या व्हिडीओवर तुफान कमेंट करत आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. एकानं तर कमेंट केलीये की, आमच्या कडं ह्याला हेन्द्री म्हणत्यात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही दिवसांपुर्वी सिद्धार्थच्या आईनं दुसरं केलं केलं होते. त्यांच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा त्यांची खूपच चर्चा रंगलेली होती. Happy Second Inning आई म्हणत सिद्धार्थनंही त्याच्या आईला शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच मितालाहीनं इमोशनल पोस्ट शेअर केली होती.