मुंबई :अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आणि खुलासे समोर येत आहेत. सिद्धार्थचे चाहते आणि कुटुंब या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या मित्रपरिवारावर देखील मोठं संकट कोसळलं आहे. अभिनेता विद्यूत जामवाल आणि सिद्धार्थ चांगले मित्र होते. सिद्धार्थची आईची देखील विद्यूतवर प्रचंड प्रेम करायची. सिद्धार्थची आई विद्यूतला घरी जेवायला देखील बोलवायच्या. विद्यूतला सिद्धार्थची आठवण सतावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विद्यूतने एका लाइव्ह व्हिडिओमध्ये सिद्धार्थसोबत व्यतीत केलेल्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. विद्यूत म्हणाला सिद्धार्थ कायम दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे असायचा. विद्यूत म्हणाला, 'आम्ही मॉडलिंग एकत्र करायचो. तेव्हा सिद्धार्थकडे हायाबुसा बाईक होती. मी जेव्हा त्याला म्हणायचो मला कोणाला भेटायला जायचं आहे तेव्हा तो म्हणायचा घरी जा आणि बाईक घे. त्याची आई मला हेलमेट आणि बाईकची चावी आणून द्यायची....'



पुढे विद्यूत म्हणाला, 'सिद्धार्थ एक खरा व्यक्ती होता. त्याला त्याच्या कोणत्याचं गोष्टीचा अभिमान नव्हता. लहान मुलांपासून ते वृद्ध आणि वॉचमॅनपर्यंत सर्वांसोबत त्याचे चांगले व्यवहार होते. सिद्धार्थ एक चांगला व्यक्ती होता. तो कायम सर्वांच्या लक्षात राहिल.' सिद्धार्थच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे.