Siddharth Jadhav on Raj Thackeray : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 100 व्या नाट्य संमेलनात हजेरी लावली होती. हे संमेलन पिंपरी चिंचवड येथे होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं घरी परतत होते. त्यावेळी खालापूर टोल नाक्यावर ट्राफिक झालं होतं. गाड्यांची भलीमोठी रांग लागली होती. त्या गर्दी राज ठाकरे देखील अडकले होते. हे सगळं पाहता संतापलेले राज ठाकरे गाडीतून उतरले आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्याला दम देत, त्या सगळ्या गाड्यांना रस्ता करुन दिला. याविषयी त्यांच्यासोबत प्रवास करत असणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवनं व्हिडीओ शेअर करत संपूर्ण गोष्ट सविस्तर सांगितली आहे. 


सिद्धार्थ जाधवला आलेला विलक्षण अनुभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ या व्हिडीओत हा संपूर्ण प्रकार सांगत असताना म्हणाला, 'नमस्कार मी सिद्धार्थ. मी राज ठाकरे यांच्यासोबत पुण्याहून मुंबईला प्रवास करत होतो. एक्सप्रेस हायवेवर, खालापूर टोल नाक्यावर ट्रॅफिकची रांग लागली होती. राज साहेब स्वत: गाडी चालवत होते. त्यांच्या पुढे असणाऱ्या पोलिसांच्या व्हॅननं त्यांना  जाण्यासाठी रस्ता करून दिला. मात्र, ते तिथून गेले नाही. आम्हाला काही कळायच्या आत ते गाडीतून उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या क्षणी राज साहेबांच्या भाषेत समजावलं की आताच्या आता गाड्या सोडा कारण 5 किमी ट्रॅफिक होती आणि त्यात एक अॅम्ब्युलन्स सुद्धा अडकली होती. लोक कंटाळली होती. राज साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेचच्या लगेच सगळ्या गाड्या पटापट सोडण्यात आल्या. एवढं करून साहेब तिथे थांबले नाही तर ते टोलवर थांबले आणि जो पर्यंत अॅम्ब्युलन्स जात नाही ते तिथेच होते. निघताना साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढील सर्व टोल नाक्यावर सुद्धा राज ठाकरे उतरले आणि ट्रॅफिक क्लिअर केली. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता सकाळीच मी त्यांची नाट्य संमेलनातील मुलाखत पाहिली होती. त्यात कलाकारांविषयी ज्या आत्मियतेनं बोलत होते तेही भावलं होतं आणि आता हे पाहिल्यानंतर काय म्हणावं.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ शेअर करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी कॅप्शन दिलं की 'VVIP म्हणून 'राज साहेबांचा ताफा सोडण्यात येत होता. टोलनाक्यावर पण राज साहेबांनी त्याचा गैरफायदा न घेता स्वत: उतरून टोल नाक्यावर रखडलेल्या सामान्य लोकांच्या गाड्यांना वाट करून दिली दुसरा कोणी नेता असता तर स्वत: ची वाट धरून पळ काढला असता हाच फरक आहे.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : अशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे


दरम्यान, राज ठाकरे यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होताय. अविनाश जाधव यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते टोल नाक्यावर उभे असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी ते तिथल्या कर्मचाऱ्याशी बोलताना दिसले. या व्हिडीओला शेअर करत अविनाश जाधव यांनी कॅप्शन दिलं की 'त्यांच्या एका 5 किलोमीटर टोल नाक्यावरच्या लांबलचक रांगांमध्ये अडकलेले लोक पाहून संतप्त राजसाहेबांनी रस्त्यावर स्वतः उतरून टोल वरील कर्मचाऱ्यांना बजावलं आणि अडकलेल्या अॅम्ब्युलन्सला रस्ता करुन दिला .