मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन सध्या आपल्याच दुनियेत मस्त आहेत... 'ए जेन्टलमेन' या सिनेमामुळे हे दोघांची चांगलीच मैत्री झाली आता तर सिद्धार्थवर जॅकलिनची अशी काही जादू चढलीय की सिनेमाचं शूटींग सोडून तो जॅकलिनच्या मागे मागे फिरताना दिसतोय... जॅकलीनच्या एका गिफ्टसाठी सिद्धार्थने कोणतीच कसर सोडली नाही... सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन यांच्या प्रेमाच्या बातम्या 'ए जेन्टलमेन' या सिनेमापासून सुरू झाल्या. हा सिनेमा तर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला पण जॅकलीन आणि सिद्धार्थच्या प्रेमाच्या गोष्टी तिथून बहरु लागल्या... सिद्धार्थने चक्क जॅकलीनसाठी आलियाशी ब्रेकअप केला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असो... आता तर जॅकलीनच्या एका गिफ्टसाठी सिद्धार्थ आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून आलाय. एवढंच नाहीतर दिल्लीमध्ये भर रस्त्यात जॅकलीनचा हात पकडून जणू काही सिद्धार्थ त्याच्या प्रेमाचं प्रमोशनच करत होता.


खरंतर जॅकलीन आपल्या मेकअप आर्टिस्ट शानला त्याच्या बर्थडेला एक कार गिफ्ट देणार होती आणि त्यासाठीच जॅकलीनने सिद्धार्थला फोन केला होता... आणि मग काय दोघं निघाले कार खरेदी करायला. 


मेकअप आर्टिस्ट शानला जॅकलीनने 20 लाख रुपयाची नवी कोरी जीप कंपास गिफ्ट म्हणून दिली. जॅकलीनच्या एका फोनवर सिद्धार्थ सगळं सोडून आला, हे प्रेम नाहीतर आणखी काय...


आणि तसंही सिद्धार्थ आणि जॅकलीनला एकमेकांची कंपनी खूप आवडते... अवॉर्ड फंक्शननध्येही त्यांच्या प्रेमाची झलक अनेकदा पाहायला मिळालाय.


मात्र, यावेळी तर जॅकलीनच्या प्रेमापोटी सिद्धार्थने सिनेमाचीही कुर्बानी दिलीय. याआधीच सिद्धार्थचे काही सिनेमे एकामागोमाग एक फ्लॉप झालेत आणि आता हे सिनेमाचं शुटिंग असं अर्धवट सोडणं, यामुळे असं नको व्हायला की जॅकलीनच्या मागे लागून सिद्धार्थचं करियरचं फ्लॉप होईल.