सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजसोबतचं शेवटचं गाणं होणार रिलीज
40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचला होता की तेवढ्यात त्यांने जगाचा निरोप घेतला.
मुंबई : 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचला होता की तेवढ्यात त्यांने जगाचा निरोप घेतला. म्युझिक व्हिडीओ, ओटीटी शो व्यतिरिक्त, अनेक उत्तम प्रोजोक्टमध्ये तो काम करत होता. सिद्धार्थ आणि त्याची लेडी लव्ह शेहनाज गिल यांनी दोन म्युझिक व्हिडिओ एकत्र केले. आणि दोन्ही व्हिडिओंमध्ये त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. गायक श्रेया घोषाल यांच्या (Habit) या गाण्याचाही ही जोडी भाग होती, पण हे गाणं अद्याप रिलीज झाले नव्हतं. 'सिडनाज'च्या जोडीच्या वेड्या चाहत्यांनी ही जोडी शेवटची वेळ एकत्र पाहण्याची विनंती केली आहे.
म्युझिक व्हिडिओचे BTS फोटो फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहेत. या दोघांचे फोटो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यासोबतच चाहत्यांनीही हा ट्रॅक लवकरच रिलीज करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या बीटीएस चित्रांमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये स्पष्ट पोज देताना दिसत आहेत.
एका फोटोमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल एक बीचवर एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये दोघेही सन बाथ घेताना दिसत आहेत. या सर्व फोटोंमध्ये शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे शानदार लूक पाहायाला मिळतोय. त्यात दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते भावुक झाले आहेत.