मुंबई : 'बिग बॉस 13' मध्ये सिद्धार्थ शुक्लाला चाहत्यांनी पाहिलं होतं. बिग बॉसच्या 13व्या सिझनमध्ये अंतिम फेरी गाठत सिद्धार्थ शोचा विजेता ठरला. शोच्या वेळीच सिद्धार्थची फॅन फॉलोइंग वेगानं वाढलं. शोचा विजेता झाल्यानंतर सिद्धार्थ काही व्हिडिओंमध्येही दिसला. आता लवकरच वेबसीरीजच्या माध्यमातून तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ शुक्लाचा इंटिमेट किसिंग सीन
गुरुवारी, सिद्धार्थ शुक्ला ट्विटरवर व्हायरल झाला. एकीकडे चाहते सिद्धार्थचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे शहनाज गिलच्या काही चाहत्यांना त्याचा हा ट्रेंड आवडलेला नाही. खरं तर, 'बिग बॉस -13' विजेता सिद्धार्थ शुक्लाचा इंटिमेट किसिंग सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सिद्धार्थ लवकरच सोनिया राठीबरोबर 'ब्रोकन बट ब्युटीफुल सीझन 3' मध्ये दिसणार आहे. या मालिकेत सिद्धार्थने सोनियासोबत इंटिमेट किसिंग सीन दिला आहे आता त्याचे व्हिडिओ आणि फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

एकता कपूरच्या 'ब्रोकन अँड ब्युटीफुल 3' ची निर्मिती देखील एकता कपूरने केली आहे. या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला ऑगस्टा रावच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच एकता कपूरनेदेखील या मालिकेतील काही व्हिडिओ शेअर केले आहेत यामुळे सिद्धार्थ शुक्लाचे चाहते या शोसाठी कमालीची उत्सुकता दाखवत आहेत. या शोचं टाइटल ट्रॅकदेखील रिलीज करण्यात आलं आहे

चाहते त्याच्या या स्टाईलचे भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिलंय की, ''मला तुझा अभिमान आहे सिद्धार्थ शुक्ला'', 'ब्रोकन बट ब्युटीफुल 3 'लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या आणि दुसर्‍या सिजनमध्ये विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत होता. विक्रांतची कहाणी सीझन 2 मध्ये संपली. आता मालिकेत नवीन कहाणीला सुरुवात होईल.