Sidharth Malhotra and Kiara Advani 70 crore house : अखेर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आता कियारा आणि सिद्धार्थ मुंबईला परतणार आहेत. लग्नानंतर ते दोघं कोणत्या घरात राहणार आहे. असा सवाल त्यांच्या चाहत्यांना आहे. दरम्यान, लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नवीन घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ आणि कियाराच्या घराचा व्हिडीओ हा सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ आणि कियारा ज्या बिल्डिंगमध्ये रहायला जाणारा ती दाखवली आहे. त्या बिल्डिंगचे नाव नायर हाऊस असे आहे. यापूर्वी मिड-डे मधील एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा हा कियारासाठी सी-फेसिंग घराच्या शोधात होता आणि त्यानं एक महागडे घर निवडले आहे. या कपलच्या जवळच्या सूत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, हे घर पाली हिल भागात आहे. या घराची किंमत ही 70 कोटी रुपये आहे. सूत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थला त्याच्या वांद्रेतील घरा प्रमाणेच समुद्र दिसली असे घर हवे होते. त्याच्या घरातून खूप सुंदर सीन दिसतो. या प्रॉपर्टीची किंमत ही 70 कोटी रुपये आहे. दरम्यान, पालीतील त्यांचा बंगला हा तयार झालेला नाही त्यामुळे तो तयार होई पर्यंत ते दोघे पाली हिलच्या घरात राहणार आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले.


हेही वाचा : Kiara-Sidharth लग्नानंतर करणार No Kissing पॉलिसीचे पालन?


या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.