मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मोकळेपणाने भाष्य केलेलं नाही. पण अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या ईद पार्टीमध्ये  सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण आता चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. कारण अनेक दिवसांनंतर दोघांना चाहत्यांनी एकत्र पाहिल्यामुळे त्यांना मोठा आनंद झाला.  



काही दिवसांपूर्वी दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हा दोघे पार्टीत एकत्र एन्ट्री घेताना दिसले. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थचं ब्रेकअप झालं नसून त्यांनी एकमेकांना स्पेस देत असल्याचं कळत आहे. 


सिद्धार्थ मल्होत्राचे 'मिशन मजनू', 'थँक गॉड', 'योधा' आणि 'इंडियन एअर फोर्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कियारा अडवाणीबद्दल सांगायचे तर कियारा ही 'जग जुग जिओ', 'गोविंदा नाम मेरा' आणि 'भूल भुलैया 2' मध्ये दिसणार आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.