No Kissing Policy after Kiara Sidharth Wedding: अखेर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता सिद्धार्थ- कियाराच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की अनेक सेलिब्रिटींप्रमाणे ते देखील ऑन-स्क्रीन नो किसिंग पॉलिसी फॉलो करणार का? चला तर जाणून घेऊया त्याबद्दल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांची पोस्ट ही मोस्ट लाइक्ड पोस्ट पैकी एक आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नानंतर आता सिद्धार्थ आणि कियारा ऑन-स्क्रीन नो किसिंग पॉलिसी फॉलो करणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा अशा कोणत्याही गोष्टींचे पालन करणार नाही, त्यांच्या चित्रपटातील पटकथेला आणि भूमिकेला ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल त्या सगळ्या गोष्टी ते करणार आहेत. त्या दोघांनी स्वत: वर आणि एकमेकांच्या प्रेमावर विश्वास ठेवला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियारानं काल त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर करत चाहचत्यांनी एक छोटी झलक दिली होती. कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले.


हेही वाचा : Akshay Kumar आणि रेखा यांच्यातील जवळीक वाढल्याने संतापली होती 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये गाजलं होतं प्रकरण


या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.