मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दिवसांमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यांचा 'अ जेंटलमॅन' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या टिमशी जेव्हा किसिंग सिनबाबत विचारण्यात आलं तेव्हा सांगितलं गेलं की,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंसरची किसिंग सिनवर कैची चालवण्यात आलेली नाही. एवढंच नाही तर यावर दिग्दर्शकांकडून देखील शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दिग्दर्शक राज पुढे सांगतात की, आमच्या सिनेमात तुम्ही भरपूर प्रमाणात किसींग सिन पाहणार आहात. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक वेळ अशी देखील आली होती की, मी सिन संपल्याचं सांगूनही काही फरक पडला नव्हता. किसिंग सिन पूर्ण झाल्यानंतर मी अनेक वेळा कट... कट... कट.... असं बोलत राहिलो. पण हे दोघं इतके मग्न होते की, माझे शब्द त्यांच्यावर कानावर देखील पडले नाहीत. दोघेही एकमेकांना किस करतच राहिले. 


मीडियासमोर ही गोष्ट आल्यामुळे जॅकलीन थोडीशी विचलित झाली. तेव्हा तिने लगेच त्या गोष्टीमागील सत्य सांगितलं. ती म्हणाली की, दिग्दर्शक हा किसिंगचा सिन अनेक अँगलने शूट करत होते. त्यामुळे ते वारंवार कट असं म्हणतं असतं. आणि त्याकडे आमचं लक्षं होतं. एवढंच नव्हे तर या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक सचिन-जिगरने स्टेजवर येताच म्हटलं की, या सिनेमात तुम्हाला आमच्या गाण्यांसोबतच सिद्धार्थ आणि जॅकलीनच्या किसिंग सीनने एंटरटेन होणार आहे