मुंबई : संजय लीला भंसाळींच्या बहूचर्चित 'पद्मावती' चित्रपटाच्या नावामध्ये आणि सिनेमामध्ये काही बदल केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.   


'पद्मावत' शी पंगा नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दीपिका पदूकोण अभिनित 'पद्मावत' हा चित्रपट  २५ जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहिती काही वेळापूर्वी देण्यात आली आहे. २५ जानेवारी रोजी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' आणि 'अय्यारी' देखील रिलीज होणार आहे. 


अय्यारीच्या रिलीज डेटमध्ये बदल  


अय्यारी या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. २६ जानेवारी रोजी रिलीज होणारा 'अय्यारी' आता ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. अय्यारीचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं आहे.   


९ फेब्रुवारी रोजी येणार अय्यारी  


'अय्यारी' चित्रपटाचा सामना अनुष्का शर्मा प्रोडक्शन हाऊसच्या 'परी' सोबत होणार आहे.