Ex-Girlfriend आलियानं शेअर केला Sidharth आणि Kiara चा Kiss करतानाचा फोटो; कियाराने केली कमेंट
Sidharth Malhotra Wife Kiara Advani Reacts On Ex Girlfriend Alia Bhatt Post: सिद्धार्थ मल्होत्राने आलियाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली असून कियाराची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.
Sidharth Malhotra Wife Kiara Advani Reacts On Ex Girlfriend Alia Bhatt Post: बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चा असलेल्या कपल्सपैकी एक म्हणजेच 'शेरशाह' फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding) अडकले. दोघांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नामध्ये मोजके सेलिब्रिटी आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. यामध्ये सिद्धार्थची रुमर्ड एक्स गर्लफ्रेण्ड आलिया भट्टचाही (Ex Girlfriend Alia Bhatt) समावेश आहे. आलियाने (Alia Bhatt) इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ-कियाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तिने सिद्धार्थ आणि कियाराच्या वैवाहिक जिवनाबद्दल नेमकं काय म्हटलं आणि कियाराने त्यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात...
सिद्धार्थ-आलियाचं नातं
सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्टने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या एकाच चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याचवेळी आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा मनोरंजन क्षेत्रात होती. मीडियामध्ये कायमच त्यांच्याबद्दलच्या बातम्या प्रकाशित होत होत्या. सिद्धार्थनेही सेलिब्रिटी चॅट शो 'कॉफी विथ करण' मध्ये आलियाबरोबरच्या रिलेशनसंदर्भातील बातम्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याने "हो यापूर्वी ती माझ्या आयुष्यात होती," असं म्हटलं होतं. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं.
आलियाचं रणबीरबरोबर लग्न...
करण जोहरच्या चित्रपटातील या दोन्ही स्टुडंट्सला वेगळं होऊन अनेक वर्ष झाली. आलियाने रणबीर कपूरबरोबर लग्न केलं. त्यानंतर आलियाला मुलगीही झाली. आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं आहे. तर याच आठवड्यामध्ये सिद्धार्थ आणि कियारा लग्न बंधनामध्ये अडकले. कियाराबरोबर सिद्धार्थचं लग्न झाल्यानंतर दोघांना शुभेच्छा दिल्या. "तुम्हा दोघांचं अभिनंदन" अशा कॅफ्शनसहीत आलियाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ कियाराचं चुंबन घेतानाच फोटो पोस्ट केला.
सिद्धार्थनेही दिला रिप्लाय
आलियाच्या या पोस्टवर आता कियारानेही प्रतिक्रिया दिली आहे. कियाराने आलियाची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी झाल्यानंतर कियाराने आलियाची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत कॅप्शनमध्ये, "थँक यू" असं लिहिलं आहे. या कॅप्शनमध्ये कियाराने लाल हार्टचा इमोजी वापरल्याने या इन्स्टा स्टोरीची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थनेही आलियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने थँक यू आलिया असं म्हणत अभिनेत्रीच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर सिद्धार्थपेक्षा कियाराच्याच प्रतिक्रियेची चर्चा आहे.