मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौटचा सिमरन हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.  सिमरनमध्ये कंगना रनोत पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये कंगना एका गुजराती मुलीचा रोल प्ले करतीये, की जी खूप महत्वाकांक्षी असते. 


अमेरिकेत जाऊन तिथे हाऊसकिपर म्हणून काम करणारी सिमरन आपल्या जिद्दी आणि अतिमहत्वाकांक्षी स्वभावामुळे गुन्हेगारी विश्वात कशी अडकत जाते, याची कहानी म्हणजे सिमरन आहे. 


कंगनाने या सिनेमात जबरदस्त बॅटिंग केली आहे. पण या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.