`तोंड बंद आहे म्हणून...`, पती प्रसाद ओकसाठी मंजिरीनं का केली अशी पोस्ट?
अभिनेता प्रसाद ओक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना कायमच आवडत असतं.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि "महाराष्ट्राची हास्य जत्रा"चा जज अभिनेता प्रसाद ओक कायमच कोणत्य़ा ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर प्रसादचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी प्रसानेआलिशान घर खरेदी केलं. नवीन वर्षाची सुरुवात अभिनेत्याने जोरदार केली. नुकताच अभिनेत्याचा वाढदिवस पार पडला. अभिनेत्याने त्याचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. मात्र अभिनेत्याच्या वाढदिवसानिमीत्त मंजिरीने शेअर केलेल्या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. मंजिरी ओकने अगदी गंमतीशीपणे प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पत्नी मंजिरी ओकने प्रसाद सोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंजिरीच्या तोंडावर मास्क दिसत आहे. तर अभिनेत्याने पत्नीच्या खांद्यावर हात ठेवत. गोड स्माईल दिली आहे. मंजिरीने शेअर केलेल्या पोस्ट शेअर अतिशय गंमतिशीर कॅप्शन या फोटोला दिलं आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन. तर जागा हो. फोटो आहे तो, मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते … तुला पर्याय नाही Oh sry sry आज चांगलं बोलायचं असतं ना ? okok I love you स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. Happyyyyyy birthday.'
अभिनेत्रीची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिनेत्याला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, Perfect भारतीय बायकोचे हक्काचे विधान देऊन शुभेच्छा दिल्यात mam haha avadla Happiest Birthday oakprasad Sir. तर अजून एकाने लिहीलंय, आज चांगलं बोलायचं असतं , खूप खूप शुभेच्छा प्रसाद सर तर अजून एकाने म्हटलंय, काय caption आहे... no words... प्रसादजी तुम्हाला उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. तर अजून एकाने म्हटलंय, वहिनी AI through फोटोतून्ही बोलू शकतात.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक याने प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. प्रसाद म्हणजे एक हरहुन्नरी कलाकार. . सोशल मीडियावर प्रसादचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.