Avadhoot Gupte: राजकारणात रॉकिंग प्रवेश करणार अवधूत गुप्ते; पक्ष कोणता? पाहाच
Avadhoot Gupte: ठरलं तर! अवधूत गुप्ते आता सक्रीय राजकारणातून म्हणणार `महाराष्ट्र माझा`. पाहा या क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या अवधूत गुप्तेचं स्पष्ट मत...
Avadhoot Gupte: मराठी कलाजगतात हरहुन्नरी आणि मनमिळाऊ कलाकार अशी ओळख असणारा अवधूत गुप्ते आता एक नवी आणि तितकीच जबाबदार भूमिका बजावताना दिसणार आहे. (Avadhoot Gupte Songs) 'ऐका दाजीबा' असो किंवा मग 'जय जय महाराष्ट्र माझा'ला नव्या रुपात सादर करणं असो. ज्या तरुणाईचा आवाज सोबतीनं घेत अवधूतनं त्याची कला सादर केली तोच आता राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. (Singer Avdhoot Gupte Big Announcement about his debut into politics latest marathi news)
गायन, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन, निर्मिती आणि रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक अशा एक ना अनेक भूमिका साकारणाऱ्या अवधूतनम आता एका नव्या वाटेवर प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसिद्ध माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं याविषयीचा खुलासा केला, पक्षाच्या नावावरून मात्र त्यानंपडदा उचललेला नाही.
मागील निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांदरम्यान त्याची व्यासपीठावरील उपस्थिती आणि त्यातून त्याच्या पक्षप्रवेशाविषयीच्या चर्चा पाहता यावर अखेर त्यानं मौन सोडलं. याबाबतचं मत मांडताना तो म्हणाला, 'कोणतीही निवडणूक असो, मला राजकीय प्रवेशाबाबत प्रश्न विचारले जाता. त्यामुळं आता एक गोष्ट उघडपणे सांगतो की मी राजकारणात प्रवेश करणार आहे', बस्स त्याच्या या एका वक्तव्यानं आता अनेक विषयांना फाटे फोडले आहेत.
हेसुद्धा वाचा : Rojgar Mela: 71,426 जणांना एकाचवेळी सरकारी नोकरी, पंतप्रधान मोदींनी दिले अपॉईंटमेंट लेटर
राजकारण कोण करतं, किंवा ते का करावं? याविषयी सांगताना ज्या व्यक्तीला स्वत:चंच पोट भरण्याचा हव्यास नाही अशा व्यक्तीकडून चांगल्या राजकारणची अपेक्षा असावी असं त्यानं स्पष्ट सांगितलं. यानंतर विषय पुन्हा आपल्या राजकीय प्रवेशाकडे वळवत तो नेमका केव्हा होईल हे अधिक स्पष्टपणे सांगितलं.
ज्यावेळी आपली कर्तव्य पूर्णत्वास गेलेली असतील, काहीही कमवायची किंवा गमवायची भावना नसेल त्यावेळी मी राजकारणात येईन, इतक्या सोप्या शब्दांत त्यानं उत्तर दिलं. आपण एखाद्या कार्यक्रमात दिसलो म्हणजे राजकारणात प्रवेश करण्याचा हेतू आहे असा विचारही करु नये असं म्हणत त्यानं काही गोष्टी जाहीरपणे स्पष्टच सांगितल्या. राजकारणात आलोच तर आपल्या हातात असणारा काळ प्रामाणिकपणे जबाबदाऱ्यांप्रती समर्पित अलेल असं सांगत त्यानं देश बदलायला फारसा वेळ लागत नाही, हा आशावादी विचार मांडला. राजकारणात प्रवेश करेन त्याच दिवशी या वर्तुळातून बाहेर पडण्याची तारीखही जाहीर करणार असल्याचं वक्तव्य त्यानं केलं. तेव्हा आता तो नेमका कधी ही नवी सुरुवात करतो तेच पाहणं औत्सुक्याचं असेल.