मुंबई : रानू मंडल आपल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाली आहे. एवढंच नव्हे तर गायक हिमेश रेशमिया यांनी दिला गाण्याची संधी देखील दिली. यामुळे आता रानू मंडल स्टार झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच रानू मंडलचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानिया' रिलीज झाला. या गाण्याच्यावेळी हिमेश रेशमियाने एक पत्रकार परिषद ठेवली होती यावेळी रानू मंडल अगदी आत्मविश्वासाने उत्तर देत होती. 


रानू मंडलवर आता लोकप्रिय गायक कुमार सानू यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे. कुमार सानू यांच असं म्हणणं आहे की, जर कोणती चांगली ऑफर आली तर ते रानू मंडलसोबत गाणं गाण्यासाठी तयार आहेत. पुढे ते म्हणाले की, मी खूष आहे की, नवीन गायक येत आहेत. जर रानू मंडल चांगल गात असेल तर तिला ओळखलं गेलं पाहिजे. जर मला ऑफर मिळाली तर मी नक्की त्यांच्यासोबत गाईन. 


सर्वत्र प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांच्याविषयीच चर्चा सुरु असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या एका वक्तव्याने मात्र वेगळ्याच चर्चांना वाव दिला होता. कोणाचीही नक्कल करत तुम्ही दीर्घ काळ यशस्वी ठरु शकत नाही, अशा आशयाचं वक्तव्य लतादीदींनी केलं होतं. त्यांच्या या अशा बोलण्यानंतर आता खुद्द रानू यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रानू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. 'लताजींचं वय पाहती मी त्यांच्याहून लहान आहे. पुढेही राहीन. मला लहानपणापासूनच त्यांचा आवाज फार आवडतो', असं त्या म्हणाल्या. या मुलाखतीत आपल्याला सलमानने ५० लाख रुपयांचं घर भेट स्वरुपात न दिल्याचंही सांगितलं.