पुणे : गानसेनांप्रमाणेच कानसेनांसारख्या दर्दी रसिकांचे प्रेम मिळणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' याचा यंदाचा आज शेवटचा दिवस आहे. 


महेश काळेच्या गाण्याने सुरूवात  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आघाडीच्या तरूण शास्त्रीय गायकांपैकी एक महेश काळे यांच्या गायनाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली. सवाईच्या शेवटच्या दिवशी रसिकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. अनेक  प्रेक्षकांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.  


गायनानंतर महेश काळेने शेअर केला खास व्हिडिओ 


गायक महेश काळेचं गाणे दुपारी 12च्या सुमारास सुरू झाले.  अभिजात शास्त्रीय संगीतामध्येही आधुनिकता जपणारा आणि प्रेक्षकांची नस ओळखून गाणार्‍या महेश काळे यंदाही प्रेक्षकांची दाद मिळवली. 


 



 


सुमारे १५,०००  प्रेक्षकांसमोर गाण्याचा अनुभव विस्मरणीय असल्याचा महेश काळेने खास संदेश फेसबुक पोस्टवर लिहला आहे.  महेश काळे सवाई महोत्सवातील सादरीकरणानंतर स्टॅन्डिंग ओव्हेशन मिळाले. या प्रेमाला शब्दात व्यक्त करणं कठीण असल्याचे महेशने सांगितले आहे. इतक्या मोठ्या प्रेक्षकांसमोर गाणं सादर करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यांने व्यक्त केली आहे.  


आज सांगता सोहळा 


महेश काळे सोबतच आज सवाईच्या शेवटच्या दिवशी पद्मा शंकर यांचे व्हॉयलिन, सुधाकर चव्हाण यांचे गाणे तसेच सारंग आणि राजन कुळकर्णींचे सरोदवादन ,  आनंद भाटे यांचे गाणे, उस्ताद शुजात खॉं यांचे सतार वादन आणि नंतर प्रभा अत्रे यांच्या गायनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.