मुंबई : अनोख्या गायनशैलीच्या बळावर हिंदी चित्रपट जगतात नेहा कक्कर हिनं आपलं भक्कम स्थान निर्माण केलं. सुरुवातीच्या काळात तिलाही संघर्ष चुकला नव्हता. खासगी जीवनातही नेहानं काही आव्हानं पेलली. ज्यानंतर रोहनप्रीत सिंग नावाच्या युवा गायकाशी तिनं लग्नगाठ बांधली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये नेहा आणि रोहनप्रीतचा लग्नसोहळा पार पडला होता. ज्यानंतर आता बरोबर एक वर्षानं या जोडीन गुड न्यूज दिली. 


ही गुड न्यूज अर्थातच कसली, याबाबतचा प्रश्न तुम्हालाही पडला ना? 


तर, ही गुडन्यूज बाळाची वगैरे नसून नात्याच्या वर्षपूर्तीची आहे. नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका खास ठिकाणी गेले. 






रोहनप्रीतनंही या सुरेख प्रवासाला एक वर्ष पूर्ण होण्यानिमित्त खास भावनिक पोस्ट लिहित काही फोटोही शेअर केले. 


'मागच्या वर्षभरात माझं आयुष्य... काही अनमोल आणि कायमस्वरुपी स्मरणात रातील असे क्षण मी सर्वात अमूल्य अशा व्यक्तीसोबत, माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीसोबत (नेहासोबत) जगलो.' असं त्यानं लिहिलं. 


तू माझं सर्वस्व आहेस असं लिहित मागचं एक वर्ष हे पापणी लवते इतक्या वेगानं गेलं असं सांगत रोहनप्रीतनं नेहाच्या कुटुंबीयांचेही आभार मानले. 


एक जोडीदार म्हणून नेहा आणि रोहनप्रीतचा आतापर्यंतचा प्रवास हा सर्वांना हेवा वाटेल असाच आहे. त्यांच्या या प्रवासानं कायमच अनेक प्रेमी जोडप्यांना Couple Goals दिले आहेत.