मुंबई : गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण त्याच्या पत्नीनंच त्याच्याविरोधात थेट न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिनं 'द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट' अंतर्गत एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तिनं न्याय मागितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती तानिया सिंह यांच्यासमक्ष ही याचिका सादर करण्यात आल्याचं कळत आहे. 'आज तक'च्या वृत्तानुसार वकील संदीप कपूर, अपूर्वा पांडे आणि जी.जी. कश्यप यांनी शालिनी तलवारच्या वतीनं ही याचिका न्यायमूर्तींसमोर मांडली. ज्यानंतर न्यायालयाकडून हनी सिंगविरोधात एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये त्यानं 28 ऑगस्टपूर्वी या नोटिसवर उत्तर देणं बंधनकारक असेल असं म्हटलं गेलं आहे. शिवाय, दोघांची मिळून असणाऱी संपत्ती न विकणं आणि स्त्रीधनाशी कोणताही खेळ न करण्याची सूचना त्याला करण्यात आली आहे. 


पत्नीकडून हनी सिंहवर गंभीर आरोप 
हनी सिंग याच्या पत्नीनं त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. शारीरिक आणि लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि आर्थिक हिंसा असे आरोप हनी सिंगवर लावण्य़ात आले आहेत. त्याच्या पत्नीसोबतच पत्नीचे आई-वडील आणि बहिणीनंही आरोप केले आहेत. शालिनीचं स्त्रीधन तिला परत मिळावं यासाठीही न्यायालयानं सूचना केल्या आहेत. 


Raj Kundra Case : 'बहिणीचा नवरा जेलमध्ये आणि ही... 'शमिता शेट्टी ट्रोल


 


20 वर्षांची मैत्री आणि रिलेशनशिपनंतर 2011 मध्ये हनी सिंग आणि शिलिनी विवाहबंधनात अडकले होते. शीख धर्मानुसार त्यांनी लग्नगाठ बांधली होती. दिल्ली येथील एका फार्महाऊसवर पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची फार चर्चाही झाली नव्हती. यानंतर 'फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात डियाना उप्पल हिच्याशी नाव जोडलं जाऊ लागल्यानंतर हनी आणि शालिनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.