Raj Kundra Case : 'बहिणीचा नवरा जेलमध्ये आणि ही... 'शमिता शेट्टी ट्रोल

राज कुंद्रा प्रकरणाचा कुटुंबियांवर होतोय परिणाम 

Updated: Aug 3, 2021, 12:16 PM IST
Raj Kundra Case : 'बहिणीचा नवरा जेलमध्ये आणि ही... 'शमिता शेट्टी ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील फिल्म (Pornography Case) प्रकरणात जेलमध्ये आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. 27 जुलै रोजी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (Shilpa Shetty Sister, Shamita Shetty Trolled For Visiting A Salon Amid Jiju, Raj Kundra Arrest) राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty)  देखील सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. हल्लीच शमिता एका सलूनमध्ये गेली होती. ज्यानंतर युझर्सने तिला ट्रोल केलं आहे. 

'मोहोबत्ते' फेम अभिनेत्री शमिता शेट्टी सोमवारी मुंबईतील जुहूमध्ये असलेल्या एका सलूनमध्ये जाताना दिसली. यावेळी तिने डेनिम शॉर्टस आणि टी शर्ट घातल होतं. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. यावर युझर्सने वेगवेगळ्या गोष्टींकरता अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

युझर्सने राज कुंद्रा प्रकरणाचा हवाला देत शमिता शेट्टीला लक्ष्य केले आहे. शमिता शेट्टीच्या व्हिडिओवर टिप्पणी करताना, एका युझरने लिहिले आहे - 'बहिणीच्या नवऱ्याच्या पैशांनी ऍश केलंस. आज बहिणीचा नवरा जेलमध्ये आहे आणि मेहुणी पार्लरमध्ये जात आहेत.'

शमिता शेट्टीला ट्रोल करत असलेल्या व्हिडिओवर अनेक युझर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत.  सोमवारीच शिल्पा शेट्टीने या प्रकरणावर तिचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. ज्यात तिने स्पष्ट केले आहे की तिने पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणात अद्याप कोणतेही विधान जारी केलेले नाही आणि भविष्यातही ती या प्रकरणी मौन पाळेल. अशा परिस्थितीत त्यांच्या वतीने कोणतेही विधान केले जाऊ नये.