`कधीही डिलिव्हरी होणार होती`, गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं
Savani Ravindra Recorded Song During Pregnancy: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे आणि सोबतच या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहे. तुम्हाला या चित्रपटातील अजून एक गमतीदार किस्सा ऐकायचा असेल तर चला तर जाणून घेऊया हा किस्सा कोणता आहे.
Savani Ravindra: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या चित्रपटाची गाणीही तूफान गाजत आहेत. या चित्रपटानं चक्क विक्रमी रेकॉर्ड्स केले आहेत. 70 कोटींची या चित्रपटानं कमाई केली आहे. या चित्रपटानं आता एक वेगळाच इतिहास रचला आहे. 'सैराट' आणि 'वेड' या चित्रपटानंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटातील गाण्यांची. या वेळी या चित्रपटातील मंगळागौर हे गाणं प्रचंड गाजते आहे. त्यातून या चित्रपटाला जेवढा प्रतिसाद मिळाला तेवढाच प्रतिसाद हा या चित्रपटांतील गाण्यांनाही मिळतो आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे.
सध्या या चित्रपटातील 'मंगळागौर' या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या सावनी रविंद्र हिनं आपल्या एका मुलाखतीतून आपलं हे गाणं रेकॉर्डिंग करतानाच किस्सा सांगितला आहे. त्यामुळे या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. हे गाणं तिनं आपल्या गरोदरपणात रेकॉर्ड केलेले आहे. तेव्हा ती नक्की काय म्हणाली आहे हे आपण जाणून घेऊया.
एका मुलाखतीत ती म्हणाली आहे की, “या चित्रपटात सुकन्या मावशीच्या बॅकग्राऊंडला एक गाणं गायचं होतं आणि तेव्हा मला पियुषचा फोन आला. पियुष (चित्रपटाचे संगीतकार) म्हणाला की सावनी तू आताच्या आता मला एक गाण रेकॉर्ड करुन पाठवशील का? त्यावेळी पहिलं लॉकडाऊन होतं आणि मी तेव्हा गरोदर होते. त्यावेळी पियुषने, मला आताच्या आता हे गाणं गाऊन पाठवं. त्या सीनचं शूटींग सुरु आहे, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, अरे, पियुष मला आता श्वास घ्यायलाही जमत नाही. माझी या आठवड्यात डिलिव्हरी आहे.
हेही वाचा - सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
त्यावेळी तो म्हणाला की, तू आता ज्या पोझिशनमध्ये आहेस ना, मला तसंच हवंय. कारण तीच या पात्राची गरज आहे. त्यावेळी मी त्या परिस्थितीत फोनमध्ये ते गाणं रेकॉर्ड करुन पाठवलं. तेव्हा मी कुठेही स्टुडिओमध्ये गेली नाही. कारण तेव्हा लॉकडाऊन होतं'', असं सावनीनं सांगितलं. सावनी रविंद्र ही लोकप्रिय गायिका आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलं आहे. तिच्या गाण्यांचेही अनेक जण फॅन्स आहेत. तिचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोवर्स आहेत. मध्यंतरी तिनं एक गाणंही आपल्या लेकीला कडेवर घेऊन रेकॉर्ड केलं होतं. या चित्रपटानं सुकन्या मोने यांच्या पात्राला नुकताच आवाज फुटतो आणि तो इमोशन दाखवण्यासाठी सावनीनं हे गाणं गायलं आहे.