सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यातून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच मात्र या चित्रपटावर सेन्सॉरनं कारवाई केली आहे. 

Aug 02, 2023, 16:54 PM IST

सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे जो 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं चक्क कात्री लावली आहे. 

1/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

gadar 2

या महिन्याच्या 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या त्याच्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच ग्रहण लागले आहे. 

2/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

sunny deol

सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटावर कारवाईचे आदेश दिले आहेत. तेव्हा जाणून घेऊया की नक्की असे किती बदल करण्यात आले आहेत. कुराण आणि गीतेच्या संदर्भात चित्रपटात एक डायलॉग आहे. 'दोनों एक ही तो हैं, बाबा नानक जी ने भी यही कहा है' या डायलॉगच्या ऐवजी 'एक नूर ते सब उपाजे, बाबा नानक जी ने भी यही कहा है' असा करण्यात आला आहे. 

3/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

trending

'तिरंगा' ऐवजी 'झंडे' हा शब्द वापरण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे. 'हर झंडे को... में रंग देंगे' असा यापुढे डायलॉग असेल. 'बता दे सखी... गये शाम...' या ठुमरीला बदलून आता त्याजागी 'बता दे पिया कहां बिताई शाम...' असे करण्यात आले आहे. 

4/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

viral

1971 मध्ये भारत-पाकिस्तानमधील युद्धाच्या संदर्भात अनेक सीन्स आहेत त्यासंदर्भात सेन्सॉर बोर्डानं निर्मात्यांना कागदोपत्री पुरावे दाखल करायला सांगितले आहेत. 'बास्टर्ड'  शब्दाच्या जागी 'इडियट' हा शब्द टाकण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाच्या सुरूवातीच्या डिस्लेमरमध्येही बदल करण्यास सांगितले आहे. 

5/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

news

'शिव तांडव' मधील श्लोक आणि शिव मंत्रांचा जप या चित्रपटाच्या हिंसाचाराच्या सीनवर आहे त्यामुळे त्यावरही सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला आहे. चित्रपटात दंगलीच्या सीनमध्ये दंगलखोरांनी 'हर हर महादेव'चा नारा केला आहे. जो या चित्रपटातून काढून टाकण्यात आलाय. 

6/6

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

marathi news

'गदर 2' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने  U/A प्रमाणपत्र दिले आहे. याबद्दल कोईमोई या संकेतस्थळानं सविस्तर रिपोर्ट दिला आहे.