मुंबई : अनेकदा छोट्या पडद्यावर अशा काही भूमिका होऊन जातात ज्याला दर्शक नेहमी लक्षात ठेवतात. यामध्येच एक नाव आहे दीपिका चिखलिया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका या त्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी काही वर्षांपूर्वी रामायणात सीतेची भूमिका केली होती. सीतेचा रोल केल्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. घराघरात त्या सीतेच्या रूपात ओळखू जाऊ लागल्या होत्या.


सिनेमांसोबतच दीपिका अनेक सिरीअल्समध्ये देखील झळकली आहे. पुन्हा एकदा आता दीपिका झळकणार आहे.


एका सिनेमातून दीपिका कमबॅक करणार आहे. दीपिका अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरुच्या जीवनावर आधारीत बनणाऱ्या सिनेमामध्ये काम करणार आहे.  दीपिका अफजलच्या पत्नीचा रोल करणार आहे. दीपिका 23 वर्षानंतर पुन्हा पडद्यावर झळकणार आहे.


सीतेच्या भूमिकेत लाखो लोकांच्या ह्द्यात जागा करणारी आता पुन्हा कशी दिसते याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.