Smita Gondkar on Marriage : मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरनं 'पप्पी दे पारुला' या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती. स्मिता सोसल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कातक राहते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे. स्मिता लवकरच 'दिल दोस्ती दिवानगी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी' चे चारही सिझन गाजवलेली मंडळी या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं चित्रपटातील कलाकारांनी प्रमोशन करताना काही मुलाखती दिल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्मितानं तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी स्मितानं नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत स्मिताला विचारण्यात आलं की 'तुला किती प्रपोजल्स आले आणि तू किती मुलांचं मन तोडलंयस? मोजता येईल का?' त्यावर उत्तर देत स्मिता म्हणाली, 'नाही, मी नाही मोजत. बिग बॉसनंतर इतके प्रपोजल्स आलेत, म्हटलं नको अजिबात नको. माझ्यात एक गोष्ट आहे ती म्हणजे मला जर जाणवलं की ही व्यक्ती किंवा कोणीही माझ्यात इन्स्ट्रेस्टेड आहे. तर मी लगेच स्वत: ला सावरते. माझ्यातली सगळ्याच वाईट बाजू मी त्यांच्यासमोर आणते. एकतर मी त्यांच्यासमोर फटकळ होते किंवा मग जर लग्नाचा विषय निघाला तर मी लगेच म्हणते लग्न वेडा आहेस का? त्यावरून समोरच्या व्यक्तीच्या मनात काही असेल तर ते लगेच विचार करतात की ही पूर्ण विरोधात आहे, तर नको बोलायला. मी खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीला रिलेशनशिप किंवा कुठे जाण्या अगोदर मैत्रीकडे वळवते.' 



लग्न नकोच, असं म्हणतं पुढे स्मिता म्हणाली की 'आपण त्यात आपला वेळ आणि आपल्या भावना गुंतवतो. पण आजच्या तारखेत मला कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. प्रत्येक गोष्टी या बदलत आहेत. त्या सगळ्या बदलासाठी मी तयार नाही. त्या पेक्षा आपण मैत्री ठेवूया. मैत्री काय कायमस्वरूपी राहते.' 


पुढे घरच्यांचकडून लग्नासाठी दबाव टाकण्यात येतो का यावर स्मिता म्हणाली की 'हो, असं होतं. पण कुठे तरी माझी मैत्री चांगली राहते पण रिलेशनशिप चांगल राहत नाही. एकच समस्या आहे की त्याकडेच पूर्ण लक्ष देते आणि मग माझं करिअरवगैरे सगळं फिस्कळतं. हे मला जाणवलं. आईला कुठे तरी वाटायचं की हिला कोणी मिळेल. मग एक दिवस मी तिला समजवलं की हे बघ, हे बघ कधी ते वर्क केलय का? किंवा मी आनंदात दिसलीये का? तुला तुझ्या मुलीचं लग्न झालेलं पाहिजे की तुझ्या मुलीनं आनंदी रहावं हे पाहिजे? या दोघांपैकी एक निवड. तू जर म्हणालीस की लग्न कर तर तुझ्यासाठी मी लग्न करेन, तू म्हणाली की आनंदी रहाव, तर हा विषय या पुढे काढूच नकोस. त्यावर आई लगेच म्हणाली की मला तुला आनंदातच पाहायचं आहे. मग संपला विषय.'


हेही वाचा : 'बेन्या' म्हणजे काय? 'हास्यजत्रा' फेम रोहित मानेनं सांगितला अर्थ!


लग्न न करण्यावर स्मिता म्हणाली, 'मी स्पष्टचं बोलते अनेकांना आवडणार नाही, पण लग्न म्हटलं की तडजोडी कराव्या लागतात. त्यावेळी कुठे तरी तुम्ही तुमचं मन मारत असता. हे प्रत्येकाला करावं लागतो. मी कुठे तरी आध्यात्मिक आहे. त्यात मोठ होण्याची माझी इच्छा आहे. सुरुवातीला जेव्हा आपण तडजोडी करतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. तुम्ही तिथे आनंदी नसता. त्यामुळे तुम्ही एकतर लग्न करू शकता किंवा मग आनंदी राहु शकता. तर मी आनंदी आहे.' 


दरम्यान, 'दिल दोस्ती दिवानगी' या चित्रपटात आपल्याला कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर,  अतुल कवठळकर,  तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी,  सुरेखा कुडची हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.