मुंबई : सुमारे ४१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'चक्र' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र धर्मराज यांनी केले होते. 'आयुष्यात जे जेथे सुरू होते ते तिथेच संपते' या विषयाभोवत चित्रपटाची कथा फिरते. तर, जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोस्टरमध्ये स्मिता पाटील अर्ध्या उघड्या अंगाने संपूर्ण वस्तीसमोर अंघोळ करताना दाखवण्यात आली आहे. यावरून बराच गदारोळ झाला. यानंतर स्मिता यांनी हे कबूल केले की जर ते त्यांच्या हातात असते तर त्यांनी हे पोस्टर प्रदर्शित होऊ दिले नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : साडी की टेबल क्लॉथ? Kriti Sanon ला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न


'चक्र' चित्रपटाच्या पोस्टरबाबत स्मिता पाटील एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, 'हे बघा माझ्या हातात असतं तर मी हे अजिबात होऊ दिले नसतं. पण चित्रपट चांगला चालला, तो एक चांगला चित्रपट होता. 'झोपडीत राहणाऱ्या एखाद्या स्त्रीने असे अंघोळ करणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही तिला पाहण्यासाठी रस्त्यात थांबणार नाही. हा पण विचार करणार नाही की ज्यांना रहायला जागा नाही त्यांना अंघोळ करायला कशी जागा असेल. पण जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता आणि हा चित्रपट जेव्हा कमर्शिअल सर्किटमध्ये विकण्यात येतो. तेव्हा पब्लिसिटी ही गोष्ट डिस्ट्रिब्युटर्सच्या हातात असतं.' 


हेही वाचा : आलिया भट्ट पाळणार कपूर कुटुंबाची प्रथा? बाळाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीला रामराम?


पुढे स्मिता म्हणाल्या, 'हिंदुस्तानाच्या लोकांसमोर ही गोष्ट नसेलही पण त्यांना फोर्स करण्यात आलं आहे की या चित्रपटात सेक्स आहे. यामध्ये महिला अर्धनग्न आहेत म्हणून तुम्ही हा चित्रपट पाहायला या. हा एक चुकीचा दृष्टीकोन आहे जो लोकांवर थोपवण्यात येत आहे. जर चित्रपट चांगला असेल तर तो पाहण्यासाठी प्रेक्षक येतील. फक्त अशा पोस्टरमुळे चित्रपट पाहण्यासाठी लोक येणार नाहीत. हे एका प्रकारे पोस्टरचे करण्यात येणार शोषण आहे.' 


हेही वाचा : Akshay Kumar कडे 260 कोटींचं प्रायव्हेट जेट? अभिनेत्याचा मोठा खुलासा


पुढे स्मिता म्हणाल्या, 'हे सगळीकडे म्हणजेच जाहिरांतींमध्ये आणि चित्रपटांमध्ये करण्यात येते. हिरोला नग्न दाखवू शकत नाही, त्याने काही होणार नाही. परंतू जर एखाद्या स्त्रीला नग्न दाखवले तर आणखी 100 लोक येतील असे त्यांना वाटते.'



हेही वाचा : 'मेरा कॅरेक्टर ढीला था, मैं लड़कियों के साथ...' ; गौहर खानसोबत साखपुडा मोडण्यावर साजिद खानचं वक्तव्य चर्चेत


चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही आणि थिएटरमध्येही काम केले. हिंदी व्यतिरिक्त, ती बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये बनवलेल्या 80 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसली. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. वैयक्तिक चरित्राबद्दल सांगायचे तर, स्मिता पाटील यांचे लग्न राज बब्बर यांच्याशी झाले होते. वयाच्या 31 व्या वर्षी  स्मिता यांचे निधन झाले. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचे निधन झाले. मुलाच्या जन्मानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मुलाचे नाव प्रतीक बब्बर असे आहे.