बॉलिवूडच्या कोणत्याही हिरोईननं नाही तर `या` मराठमोळ्या अभिनेत्रीनं पटकावला आंतरराष्ट्रीय पुरस्कार...
Smita Tambe: सध्या भारतीय अभिनेत्रींची आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही जोरात चर्चा आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि चोखंदळ अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे.
Smita Tambe: भारतीय अभिनेत्रींचा डंका हा आता आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही गाजतो आहे. त्यांची चांगलीच चर्चा असते. आलिया भट्ट, दीपिका पादूकोण, प्रियांका चोप्रा यांनी आतापर्यंत अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असतील आणि सोबतच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळखही प्राप्त झाली आहे. परंतु आता आम्ही तुम्हाला कोण्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार नाही आहोत तर आम्ही तुम्हाला अशाच एका हरहुन्नरी मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.
नुकताच तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे स्मिता तांबे. 2013 साली आलेला '72 ंमैल एक प्रवास' या चित्रपटातून तिला पाहिला असेलच. हा चित्रपटही बराच गाजला होता. या चित्रपटाचीही बरीच चर्चा होती.
स्मिता तांबे हिच्या अनेक लोकप्रिय भुमिका गाजल्या आहेत. यावेळी स्मिता तांबे हिच्या 'जोरम' या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. तिचा हा चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर गाजतो आहे. तिला तिच्या या चित्रपटासाठी स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचा हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातला स्मिता तांबेचा लुक हा फारच भारदस्त वाटत असून तिनं तिच्या या चित्रपटातल्या भुमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असल्याचे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे सध्या तिच्या या चित्रपटाची बरीच चर्चा आहे.
हेही वाचा : अगस्त्य नंदासोबत रोमॅण्टिक डान्स केल्यानं सुहाना खान ट्रोल; नेटकऱ्यांचा शाहरूख खानवर निशाणा, म्हणाले, 'हिला घरी...'
एकूण 12 विभागांपैंकी 'जोरम' या चित्रपटानं दोन पुरस्कार पटकावले आहेत. लॉस एंजेलिसमधल्या डाऊनटाऊनमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला आहे. हा चित्रपट नुकताच मामि या चित्रपट महोत्सवातही दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला बेस्ट ज्यूरी हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
झी स्टुडिओची साहाय्यक निर्मिती असलेला जोरम हा चित्रपट आहे. देवाशिष माखिजा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. स्मिता तांबेसह या चित्रपटात मनोज वाजपेयी, तनिष्ठा चॅटर्जीही आहेत. 'जवान', 'जोगवा', 'देऊळ', 'नूर','पंगा' अशा अनेक चित्रपटांतून ती गाजली आहे. तिला मराठीतही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.