Actress Lucky No Time For Love : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं आजवर अनेकांना चित्रपटसृष्टीत लॉन्च केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे स्नेहा उल्लाल. पण त्यानंतर स्नेहा बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं नाही. ऐश्वर्यासारखी दिसते यामुळे चर्चेत आलेली स्नेहा उल्लालच्या करियरला एका आजारामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. आज 18 डिसेंबर रोजी स्नेहाचा 37 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहा उल्लालनं 2005 मध्ये 'लकी नो टाइम फॉर लव' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. स्नेहा उल्लाल ही अगदी हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसायची. आजही तिला सगळे ऐश्वर्याची ड्युप्लिकेट असं म्हणतात. सलमानच तिला स्नेहा उल्लालचा चित्रपटात घेऊन आला पण तिचं अभिनय क्षेत्रात नशिब चमकलं नाही. एक अशी वेळ होती जेव्हा एका गंभीर आजारामुळे ती अर्धा तास देखील उभी राहू शकत नव्हती. 



स्नेहा उल्लाल ही मस्कटची राहणारी होती. पण त्यानंतर आईसोबत मुंबईत शिफ्ट झाली. ती वर्तक कॉलेजमध्ये शिकत होती त्याच कॉलेजमध्ये सलमानची बहीण अर्पिता खान देखील शिकत होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि अर्पितानेच सलमानच्या 'लकी: नो टाइम फॉर लव' या चित्रपटासाठी तिचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटात तिला पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. स्वत: सलमान खाननं एका मुलाखतीत खुलासा केला की तो स्वत: स्नेहाला पाहून गोंधळला होता आणि त्याला वाटलं ही की ऐश्वर्या रायचं आहे. 


हेही वाचा : कोण आहे 'वसूली भाई'ची पत्नी? चित्रपटसृष्टीपासून दूर कॉर्पोरेटमधये जॉब करतो मुलगा


स्नेहा उल्लालचं नशिब बॉलिवूडमध्ये चमकलं नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिनं तिचं नशिब आजमावलं. तिनं तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आणि लोकप्रियता मिळवली. एक असा काळ आला जेव्हा उल्लाल ही चित्रपटसृष्टीतून गायब झाली. स्नेहा उल्लालच्या शरिरात ताकद राहिलीची नव्हती त्यामुळे ती 30 मिनिटं देखील उभी राहू शकत नव्हती.  तरी सुद्धा ती सतत शूटिंग करत राहिली. त्यामुळे तिची अवस्था इतकी खराब झाली की तिनं सगळ्यापासून स्वत: ला दूर करून घेतलं. जवळपास चार वर्ष या सगळ्यापासून लांब राहिल्यानंतर स्नेहा उल्लालनं चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलं. स्नेहा उल्लालनं 2020 मध्ये एक वेब सीरिजमध्ये काम केलं आणि त्यानंतर 2022 मध्ये ती 'लव यू लोकतंत्र' मध्ये दिसली. त्यानंतर स्नेहानं कोणत्या चित्रपटात काम केलं नाही.