...म्हणून सारासोबत फोटो काढण्यास कार्तिकचा नकार
कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी `लव आज कल २`मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगताना दिसत आहेत. हे प्रेमी युगूल त्यांच्या आगामी 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये व्यस्त आहे. हे दोघे कधी विमानतळ, हॅटेलमध्ये एकत्र दिसतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.
परंतु आता पपाराजीकडे कार्तिकने सारा सोबत फोटो न काढण्यासाठी आवाहन केले आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, कामा व्यतिरिक्त जेव्हाही सारा-कार्तिक बाहेर निघतात तेव्हा प्रत्येक चाहता त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतो.
परंतु, मला सारा अली खानच्या बॉयफ्रेंडच्या नावाने ओळख नको असून मला माझ्या कामामुळे ओळखण्यात यावे असे त्याचे म्हणणे आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' चित्रपटात सारा-कार्तिक एकत्र झळकणार आहेत.
कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर कार्तिक 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.