मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने बाजी मारत यजमान ऑस्ट्रेलियाला नमवलं. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघावर अनेकांनीच कौतुकाचा वर्षाव करण्या सुरुवात केली. ज्यामध्ये अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माही मागे राहिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराट आणि भारतीय क्रिकेट संघाचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोंसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्येही  तिने आपला आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 


नवं वर्षाचं स्वागत विराटच्याच साथीने करणाऱ्या अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोसोबत लिहिलं, 'ते आले... त्यांनी जिंकलं.... या एका गटाने इतिहासच रचला आहे. संघातील सर्वच खेळाडूंनी खूप साऱ्या शुभेच्छा', असं तिने लिहिलं. यासोबतच तिने विराटचा आपल्याला फार अभिमान वाटत असल्याचंही सांगितलं. अनुष्काने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मालिका जिंकल्यानंतरच्या काही खास क्षणांचे फोटो पाहायला मिळत आहेत. 




विराट आणि अनुष्का नेहमीच एकमेकांच्या कामाची प्रशंसा करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यातच आता अनुष्काची ही पोस्ट पाहता त्यांच्या नात्याची सुरेख बाजू पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.  मुख्य म्हणजे कामाचा कितीही व्याप असला तरीही त्यातूनच वेळ काढत विरुष्का नेहमीच विविध मार्गांनी एकमेकांच्या खासगी आयुष्यासोबतच करिअरवरही लक्ष ठेवून असतात.