मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा याला मुंबई कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली. त्याचदिवशी 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टंट सोफिया हयातने मंगळवारी एक मोठं विधान केलं. सोफिया हयात म्हणाली की, बॉलिवूडच्या इच्छुक लोकांना बेईमान उद्योजकांकडून अश्लील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फसवणं असामान्य नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफिया हयात म्हणाली, "एका कास्टिंग एजंटने एकदा मला सांगितलं की, सिनेमात एक हॉट सीन आहे आणि त्यासाठी मला दिग्दर्शकाला दाखवावं लागणार आहे की मी यासाठी काम करू शकते का." सोफिया हयातला तिच्याबरोबर घडलेला हा वाईट अनुभव आठवला. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सोफियाने 'बिग बॉस 7' मध्ये प्रवेश केला होता.


सोफिया म्हणाली, "हे मला माहित होतं की, ही एक अयडिया आहे. कारण व्यावसायिक कधीही कलाकाराला असे सीन करायला सांगत नाही. मी माझ्या कारकीर्दीत दोन रोमँन्टिक सीन केले आहेत. आणि शूटच्या आधी मला कुणीही सीक्वेन्स करण्यास सांगितला नाही."


हयात म्हणाली की, बॉलिवूडच्या इच्छुकांना अशा प्रकारच्या ऑफर्सपासून सावध राहिलं पाहिजे. ती म्हणाली की, "हे लोकांना प्रेमापासून दूर करते आणि केवळ वासनांना परवानगी देते. जो कोणी अश्लील विक्री करतो तो प्रेमाचा शत्रू असतो."


ती म्हणाली की, तिचे काही व्यावसायिक काम स्क्रीनवर रेकॉर्ड केलं गेलं आहे आणि अॅप्सवर अपलोड केले आहे. ज्याची कुंद्राशी संबंधित आरोपांबद्दल चौकशी करत आहेत. 


चित्रपटसृष्टीतील अनेक व्यावसायिकांनी तरुण महिलांचा फायदा घेतल्याचंही तिने यावेळी निदर्शनास आणून दिलं. ती म्हणाला की, त्याची एकमेव प्रेरणा पैसा आहे आणि त्याने स्त्रियांचं जे केले ते बलात्काराच्या बरोबरीचं आहे.