मुंबई : कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. अभिनेता कुणाल खेमूने ट्विटरच्या माध्यमातून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही सारे खूप आनंदामध्ये आहोत. आजच्या शुभदिवशी आमच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. तुमचे प्रेम आणि आशिर्वादाचे आम्ही आभारी आहोत. असे सांगत कुणालने चाहत्यांचे आभार मानले. 



 


कुणाल खेमूचा लवकरच 'गोलमाल अगेन' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. गोलमालच्या पहिल्या तीन भागांनी रसिकांना खळखळून हसवले. त्यानंतर चौथा भागाकडून रसिकांना अपेक्षा आहेत. त्यामुळे कुणाल खेमूचा आनंदही द्विगुणित झाला आहे.  
जानेवारी २०१५ मध्ये सोहा आणि कुणाल खेमु विवाहबद्ध झाले होते. आता तैमुर अली खानच्या जोडीला गोड बहीण आल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.