मुंबई : पटौदी परिवारात जन्मलेल्या सोहा अली खानचा आज 40 वा वाढदिवस. सोहा हिचा जन्म 4 ऑक्टोबर 1978 मध्ये झाला. सोहाचे वडिल मंसूल अली खान हे पटौदी खानदानाचे नववे नवाब होते. तिची आई शर्मिला टागोर ही 70-80 दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री. तीन भावंडात सोहा सर्वात लहान आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहाची सर्वात मोठी बहिण ही ज्वेलरी डिझाइनर आहे. तसेच ती एक डायमंड चैनदेखील चालवते. सोहाचा भाऊ सैफ अली खान आपल्याला माहितच आहे एक उत्तम अभिनेता. सोहाचं शिक्षण दिल्लीतील एका ब्रिटीश शाळेत झालं. यानंतर ती लंडनमध्ये ऑक्सफर्डमध्ये पुढील शिक्षणासाठी गेली. सोहा शिक्षणात खूप चांगली होती. त्यानंतर तिने लंडनमध्ये स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिटीकल सायन्स ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मास्टर केल. शिक्षण पूर्ण झाल्यावर सोहाने बँकेत काम केलं यामध्ये फोर्ड फाऊंडेशन आणि सिटीबँकेचा समावेश आहे. 


2004 मध्ये सोहाने 'इति श्रीकांत' या सिनेमातून फिल्मी करिअरमध्ये डेब्यू केलं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिने शाहीद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' या सिनेमात काम केलं. 'रंग दे बसंती' या सिनेमातून तिला ओळख मिळाली. 2006 मध्ये आलेल्या या सिनेमाकरता सोहाला आयफा आणि जिफाचा बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला.