VIDEO : सोहेल खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री! मिस्ट्री गर्लसोबत डिनरनंतर Private Moment कॅमेऱ्यात कैद
Sohail Khan With His Rumoured Girlfriend : सोहेल खानचा सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sohail Khan With His Rumoured Girlfriend : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि सीम सजदेह हे 2022 मध्ये अधिकृतरित्या विभक्त झाले. तर 1998 मध्ये लग्न बंधनात अडकलेल्या हे जोडपं विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सोहेलच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली आहे. पण यावेळी एक मिस्ट्री गर्ल दिसली आहे. खरंतर सोमवारी रात्री सोहेल एका मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेटवर पोहोचली होती. त्यानंतर असं म्हटलं जातंय की पुन्हा एकदा सोहेलला प्रेम झालं आहे.
इंस्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक सोहेल खान एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे आणि त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की ही दुसरी कोणी नसून सोहेल खानचं नवं प्रेम आहे. मात्र, यावर सोहेल किंवा त्यांच्या जवळच्या मित्रांकडून किंवा कुटुंबाकडून यावर दुजोरा दिलेला नाही.
मात्र, या व्हिडीओला पाहून अनेकांनी आश्चर्यव्यक्त केलं. एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'म्हातारपणात गर्लफ्रेंड?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं होतं की हा एकच आहे जो बायको आणि मुलांमध्ये राहिला. पण याची देखील गर्लफ्रेंड आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सलमानच्या नशिबात असलेलं प्रेम हे सोहेल आणि अरबाजला मिळालं.'
दरम्यान, सीमा सजदेह आणि सोहेल खाननं 1998 मध्ये लग्न केलं होतं आणि 24 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर 2022 मध्ये जोडप्यानं घटस्फोटाचा अर्ज भरला होता. काही काळाआधी सीमानं एक पॉडकास्टमध्ये सोहेल पासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला. तिनं सांगितलं की अनेकांना वाटतं की आमच्या घटस्फोटासाठी दुसरी महिला ही कारणीभूत आहे, पण खरं हे आहे की घटस्फोट घेण्याचा निर्णय माझा होता.
सीमानं पुढे सांगितलं की 'तेव्हा निर्वाण हा शाळेत होता आणि त्याच्याशी माझं सतत बोलणं होतं होतं. त्यानंतर तो यूनिव्हर्सिटीमध्ये गेला आणि त्यानं सांगितलं की आई, मी ठीक आहे, तू तुझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकते. तेव्हाच मी निर्णय घेतला की ठीक आहे आता मी घटस्फोट घेऊ शकते आणि फक्त कागदोपत्रीच गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या.' खरंतर 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइफ्स' विभक्त होण्यावर इशारा दिला होता.