मुंबई : बॉलिवूडमधील नावाजलेले निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे.


त्यांच्याबद्दल काही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे वडील दिल्लीत डेंटिस्ट होते. सुभाष घई यांनी रोहतक येथून ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. 


सुभाष घई अक्टर बनण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र अक्टर म्हणून सफलता मिळू न शकल्याने त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. आणि त्यात त्यांनी चांगले यश मिळवले.सुभाष घई यांनी मुक्ता यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव देखील मुक्ता आहे.


अनेक हिट चित्रपट


सुभाष घई यांनी बॉलिवूडमध्ये खूप हिट चित्रपट दिले आहेत. म्हणूनच त्यांना बॉलिवूडचे दुसऱ्या शो मॅनचा किताब मिळाला. सुभाष यांनी वर्ष १९८२ मध्ये आपल्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. 'ऐतराज', 'इकबाल', 'चाइना टाउन', 'अपना सपना मनी मनी' हे त्यापैकी काही.


 नॅशनल अवॉर्डने सन्मानित


सुभाष घई यांना २००६ मध्ये सोशल इशू वर चित्रपट बनवल्याने नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.


पहिला चित्रपट


सुभाष घईंनी दिग्दर्शक केलेला पहिला चित्रपट म्हणजे कालीचरण. यात शत्रुघ्न सिन्हा मुख्य भुमिकेत होते. चित्रपटाने खूप चांगली कामगिरी केली होती.