मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला संजय लीला भंसाळी यांचा 'पद्मावत' चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला. विरोधानंतरही या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आणि गल्लाही भरपूर भरला आहे.  या चित्रपटातील प्रत्येक सीन हा खूप बारकाईने चित्रीत करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण भव्यता आणि क्रिएटीव्हीट असताना या चित्रपटात काही मूलभूत चुका झाल्या आहेत. या चुकाल शुल्लक आहेत पण त्या सहज नजरेत पडता. आज आम्ही या चुकांबद्दल तुम्हांला सांगणार आहे. 



ओढणी पडते...


चित्रपटात एक सीन असा दाखविण्यात आला आहे की राणीच्या भूमिकेत असलेली दीपिका पदुकोण आपल्या हातात पूजेची थाळी घेऊन येते. तेव्हा राजाची भूमिका करणाऱ्या शाहिद कपूर जवळ जाते त्यावेळी राजा तिचा हात पकडतो. यावेळी तिची ओढणी खाली पडते. पण दुसऱ्या सीनमध्ये दाखवले की तिच्या खांद्यावर पुन्हा ओढणी आलेली आहे. राणीच्या एका हातात पूजेची थाळी आणि दुसरा हात राजाने पकडला आहे. त्यामुळे पडलेली ओढणी कशी उचलणार हा प्रश्न एडिटींग करताना लक्षात आला नाही. 


....



लढाईच्या मधला सीन 


या चित्रपटातील एका सीनमध्ये खिलजी (रणवीर सिंह) एका गोल आखाड्यात कुस्ती करताना दिसतो आहे. तेव्हा आखाड्याच्या चारही बाजुला गर्दी आहे.  पण जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा केवळ दोन रांगेतच नागरीक उभे आहेत. ही चित्रपटातील मोठी चूक मानली जाते. 


............



नकली फूलाचा वास घेतो खिलजी 


या चित्रपटाच्या एक सीनमध्ये खिलजी खुर्चीवर बसला आहे. त्याच्या हातात कमळाचे फूल आहे. त्याचा तो लागोपाठ सुगंध घेत असतो. निरखून पाहिले तर लक्षात येते की हे कमळाचे फूल नकली आहे. 


............



गुलालाचा रंग 


एका सीनमध्ये दाखविले की राणी गुलालाची थाळी घेऊन राजाजवळ जाते. या थाळीतील गुलाल हाताला लावून ती अनेकवेळा राजाच्या कपड्यांवर छापे मारते. राणीच्या हातात कोरडा गुलाल असतो आणि सुकलेल्या गुलालचे छाप राजाच्या कपड्यांवर कसे पडतात हा साधा प्रश्न दिग्दर्शकाला पडलेला नाही. 


............



मांस खातो खिलजी 


या चित्रपटात खिलजी कच्चे मांस खाताना दिसत आहे. पण लक्षपूर्वक पाहिले तर खिलजी मांस खातो पण त्याच्या मांसाची साईज कमी झालेली दिसत नाही. ते तेवढचे राहते. 


............



दीपिकाचे केस मागे पुढे... 


एका सीनमध्ये राणी राजाकडे पळत जाते तेव्हा तिचे केस मागे असतात. पण पुढच्या सीनमध्ये तिचे केस पुढे दाखवले आहेत.